न्यायमूर्ती प्रवीण एस. पाटील यांची धामणगाव रेल्वे बार असो. ला भेट

उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर येथील

यायालयीन कामकाजाची पाहणी

धामणगाव रेल्वे/20 सप्टेंबर– मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे माननीय न्यायमूर्ती श्री. प्रवीण एस. पाटील यांनी नुकतीच धामणगाव रेल्वे बार असोसिएशनला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी न्यायालयाच्या कामकाजाची पाहणी करून विविध विभागांचा आढावा घेतला. न्यायमूर्तींच्या या उपस्थितीमुळे न्यायालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच अधिवक्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. बार असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष अ‍ॅड. राजेश चांडक, सचिव अ‍ॅड. तुषार मनोहरा फळके आणि कोषाध्यक्ष अ‍ॅड. प्रसाद कावळे यांनी माननीय न्यायमूर्ती प्रवीण एस. पाटील यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार केला. या कार्यक्रमास अमरावती न्यायालयाच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती उज्ज्वला नंदूरकर, जिल्हा व सत्र न्यायाधीश-1 श्री. ए. जी. जोशी, जिल्हा व सत्र न्यायाधीश-3 श्री. पी. पी. शर्मा, जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. एस. टी. सहमाये, दिवाणी न्यायालय धामणगाव रेल्वे येथील श्री. ई. बी. जावळे तसेच सहदिवाणी न्यायाधीश एल. एल. तामगडे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच बार असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी व इतर अधिवक्त्यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अ‍ॅड. अश्विनी सी. परडळकर यांनी केले, तर प्रास्ताविक सचिव अ‍ॅड. तुषार मनोहरा फळके यांनी मांडले. या वेळी न्यायमूर्तींनी उपस्थित अधिवक्त्यांशी संवाद साधताना न्यायव्यवस्था बळकट करण्यासाठी अधिवक्त्यांची भूमिका, न्यायालयीन शिस्त आणि पक्षकारांना जलद व सुलभ न्याय मिळवून देण्यासाठी समन्वय राखण्याचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच, बार असोसिएशनतर्फे स्थानिक न्यायाल यांच्या विविध अडीअडचणी व आवश्यक सुविधांबाबत न्यायमूर्तींशी चर्चा करण्यात आली. या सदिच्छा भेटीमुळे धामणगाव रेल्वे येथील बार असोसिएशन व न्यायालयीन काम काजाला नवीन ऊर्जा मिळाली असून, न्यायदान प्रक्रिया अधिक प्रभावी व लोकाभिमुख करण्यासाठी मोठी प्रेरणा मिळाल्याची भावना उपस्थित वकिलांनी व्यक्त केली.

Back to top button