उन्हाच्या चटक्यात कसं राबवणार ‘शाळा पूर्वतयारी अभियान’? शिक्षकांसमोर प्रश्नचिन्ह

भर उन्हात विद्यार्थी मेळावा, 26 एप्रिल ते 1 मे ला आयोजन

अमरावती/30 एप्रिल: इयत्ता पहिलीत प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ’शाळा पूर्वतयारी अभियान’ राबवण्याचे निर्देश देण्यात आलेत. असं असताना एप्रिल, मे महिन्यात प्रचंड उन्हामुळं या उपक्रमाच्या अंमलबजावणीवर शिक्षकांकडून आक्षेप घेतला जात आहे. एकीकडं कृती आधारित शिक्षक, पालक सहभाग आणि पूर्वतयारीवर भर देण्यात येत असताना दुसरीकडं 45 डिग्री तापमानात लहान मुलांना शाळेत बोलावणं कितपत योग्य? असा सवाल उपस्थित होत आहे.
अभियानाची रूपरेषा आणि उद्दिष्ट : अमरावती जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी शाळा पूर्वतयारी अभियान राबवण्यात येणार आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार्‍या या अभियानाचा उद्देश इयत्ता पहिलीत दाखल होणार्‍या विद्यार्थ्यांची शाळेसाठी मानसिक, सामाजिक आणि शैक्षणिक तयारी करणं हा आहे. या संदर्भात 26 एप्रिल ते 26 जून या कालावधीत सुमारे सहा ते सात आठवड्यांचा उपक्रम राबवला जाणार आहे.
मेळावे आणि कृती आधारित उपक्रमांची आखणी : या अभियानात शाळास्तरावर दोन प्रमुख मेळावे आयोजित केले जाणार आहेत. पहिला मेळावा 27 एप्रिल ते 26 मेदरम्यान तर दुसरा 15 ते 20 जून या कालावधीत होणार आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध स्टॉल्स उभारून कृती आधारित शिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये भाषिक कौशल्य, संख्याज्ञान, सामाजिक आणि भावनिक विकासावर भर दिला जाणार आहे.
पालक सहभाग आणि स्थानिक यंत्रणेची भूमिका : या उपक्रमात मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, स्वयंसेवकांचा सक्रिय सहभाग अपेक्षित आहे. विशेष म्हणजे पालकांचा सहभाग वाढवण्यासाठी दर आठवड्याला मार्गदर्शन, व्हिडिओ आणि वर्कशीट्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासह तालुका स्तरावरील अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित राहून अंमलबजावणीवर देखरेख ठेवणारी सर्व माहिती ऑनलाइन पोर्टलवर नोंदवणे बंधनकारक राहणार आहे.
डिजिटल रिपोर्टिंग आणि जनजागृती : अभियानाशी संबंधित फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना ’शाळा पूर्व तयारी अभियान 2026’ हॅशटॅग वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. क्यूआर कोडद्वारे उपलब्ध व्हिडिओच्या माध्यमातून अभियानाची माहिती समजावून सांगण्याची सोयही करण्यात आलीय. उन्हाचा फटका, शिक्षकांसमोर अडचणी : दरम्यान, एप्रिल महिन्यातच पहिलीच्या प्रवेशासाठी कार्यक्रम घेण्याचे आदेश दिल्यानं शिक्षकांसमोर मोठं आव्हान उभं टाकलंय. अमरावती जिल्ह्यात सध्या तापमान 45 ते 46 अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यामुळं अशा परिस्थितीत सहा वर्षांच्या लहान मुलांना शाळेत बोलावणं धोकादायक ठरू शकतं, अशी भीती व्यक्त केली जातेय. विशेषतः उष्माघाताचा धोका लक्षात घेता या काळात उपक्रम राबवणं योग्य नसल्याचं मत व्यक्त केलं जातंय.
महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचा आक्षेप : शाळा पूर्वतयारी संदर्भात यावर्षी 30 एप्रिलपर्यंतच कार्यक्रम राबवण्यासंदर्भात शासनाच्या भूमिकेवर महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीने आक्षेप नोंदवलाय. दरवर्षी शाळा सुरू झाल्यानंतर घेतला जाणारा हा उपक्रम यावेळी एप्रिलमध्येच राबविण्याचा निर्णय चुकीचा आहे. प्रचंड उष्णतेत लहान मुलांच्या आरोग्याची तडजोड केली जात आहे, असा आरोप महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे प्रतिनिधी राजेश सावरकर यांनी केला. विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यांमध्ये शाळा 26 जूननंतर सुरू करण्याबाबत उच्च न्यायालयाचा आदेश आहे. असं असताना 15 जूनपासून शाळा सुरू करण्याच्या निर्णयालाही राजेन्यायालयीन लढ्याचा इशारा : विदर्भातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्यानं आवश्यक असल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल. शासनाच्या निर्णयाविरोधात कायदेशीर लढा देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असा इशारादेखील राजेश सावरकर यांनी दिलाय.

संबंधित बातम्या

Back to top button