मातोश्री सावित्रीबाई फुले यांच्या लेकींचा गौरव

सर्वशाखीय माळी समाज ऋणानुबंधच्यावतीने

अमरावती /18 डिसेंबर : सर्वशाखीय माळी समाज ऋणानुबंध महिला आघाडीच्या जिल्हा शाखाची बैठक 17 डिसेंबर रोज वर्‍हाड विकास येथे घेण्यात आली. राष्ट्रपिता महात्मा फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांना आदरांजली अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. जिल्हा अध्यक्षा स्मिता संजय घाटोळ ह्या अध्यक्षस्थानी होत्या. जिल्हा कार्याध्यक्षा प्रा.डॅा. सौ. उज्ज्वला सुरेश मेहरे, उपाध्यक्षा सौ. वैजयंता प्रशांत टवलारे, सरपंच सौ. शिल्पा तुषार खवले, सौ. सुनंदा श्रीकृष्ण बनसोड आणि शहर अध्यक्षा सौ. जयश्री प्रकाश कुबडे आदि पदाधिकारी प्रमुख अतिथी होत्या.
याप्रसंगी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंच्या लेकी सौ. रजनी दिपक आमले, सौ. छाया कथिलकर, सौ. हर्षा अतुल होले, सौ. सुनंदा मधुकर आखरे, सौ. मेघा निलेश निमकर, प्रांजली कुबडे सह इतरही सेवाभावी कर्तृत्ववान महिलांचा पुष्पगुच्छ, फुले दाम्पत्यांची प्रतिमा व उद्योगपती महात्मा फुले ही विचार पुष्प भेट देवून गौरव करण्यात आला.समाजभूषण प्रा.श्रीकृष्ण बनसोड यांनी, माळी समाजातील महिलांनी सक्षमीकरणासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या माध्यमातून राजकारणात उडी घेण्याची गरज व्यक्त केली. जयश्री कुबडे, सौ. रजनी आमले व सौ. छाया कथिलकर यांनी अमरावती महानगरपालिका निवडणूकीत उमेदवारी जाहिर करावी. त्यांना महिला आघाडीत पाठींबा जाहीर करण्यात आला. अध्यक्षीय भाषणातून स्मिता घाटोळ यांनी महिलांनी उद्योग व्यवसाय सुरु करुन स्वावलंबी व स्वयंपूर्ण होण्याचे आवाहन केले. या प्रसंगी जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय स्थितीचा आढावा घेवून सर्वंकष विचार मंथन करण्यात आले.माळी समाजातील महिलांनी रविवार दि.4 जानेवारी 2026 रोजी 30 वे बहुराज्यस्तरीय सर्वशाखीय माळी समाज ऋणानुबंध परिचय महासंमेलनाला उपस्थित राहण्याची विनंती प्रा.डॅा. अस्मिता बनसोड, शारदा गणोरकर, कल्पना होले, पुष्पा निमकर, भारती अडगोकर, प्रविणा अंबाडकर, विजया खासबागे, सिंधु भडके, रेखा खैरे, सारीका वासनकर, संगिता पाचघरे, पो.पा. कविता पाचघरे आदिंनी केली. मधुकर आखरे यांनी आभार प्रदर्शन केले.

Back to top button