अभिनेता शरद पोंक्षेंची मनुस्मृतीच्या विधानाची माफी

नागपूर /1एप्रिल : मराठी अभिनेते शरद पोंक्षे कायम त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. अशातच आता दोन दिवसांपासून शरद पोंक्षे यांनी नागपूरमधील भाषणात वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप होत आहे. सर्वच स्तरातून पोंक्षे यांच्यावर टीका होत असताना त्यांनी स्वत: इन्स्टाग्रामवर एक व्हीडीओ प्रसारित करून आपल्या एका वक्तव्यावर माफी मागितली आहे. शरद पोंक्षे यांनी सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला. यामध्ये शरद पोंक्षे म्हणाले की, ‘नमस्कार!सध्या माझं एक वक्तव्य मीडिया फिर वतंय. अशी नेहमीच माझी वक्तव्य तोडून-मोडून फोडून मीडियावाले फिरवत असतात. संपूर्ण भाषण कोणी कधी दाखवत नाही. माझ्या भाषणातलं मागचं पुढचं सगळं कापून त्यामुळे समाजात वाद कसा निर्माण होईल, याबद्दल काळजी घेऊन नेहमी माझी वक्तव्य टाकत असतात.




