कर्तृत्ववान विद्यार्थ्यांचा आणि सैनिकांचा मोठा सत्कार

कुणबी समाज मंडळातर्फे आयोजन

 आ.रवि राणा यांची उपस्थिती

अमरावती /28 सप्टेंबर :अमरावतीच्या संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात कुणबी कृषी समाज मंडळातर्फे आयोजित ‘समान कर्तृत्वाचा सोहळा 2026’ अत्यंत उत्साहात पार पडला. या भव्य कार्यक्रमाला आमदार रवी राणा यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
या सोहळ्यात शिक्षणात उत्तम यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा, क्रीडा क्षेत्रात नाव उज्ज्वल करणार्‍या खेळाडूंचा आणि देशाचे रक्षण करणार्‍या सैनिकांचा जाहीर सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात करताना आ. रवी राणा यांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये चमकदार कामगिरी करणार्‍या विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकेची थाप दिली. विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या जोरावर कुटुंब, समाज आणि देशाचे नाव उंच करावे, असे मोलाचे मार्गदर्शन त्यांनी केले. तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करून समाजासमोर आदर्श निर्माण करणार्‍या महिलांचा आणि विशेष पुरस्कार प्राप्त केलेल्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. देशसेवेचे कठीण व्रत हाती घेतलेल्या सेवायोजन व सेवानिवृत्त सैनिकांचा सत्कार करून उपस्थितांनी त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. समाजातील गुणवंतांचा गौरव करणे, त्यांच्या कार्याची दखल घेणे आणि नवीन पिढीला प्रगतीसाठी ऊर्जा देणे हा या संपूर्ण सोहळ्याचा मुख्य उद्देश होता. या प्रेरणादायी कार्यक्रमामुळे उपस्थितांमध्ये आणि गुणवंतांमध्ये एक नवा उत्साह निर्माण झाला. या दिमाखदार सोहळ्याला कुणबी समाज मंडळाचे अध्यक्ष भगवानराव ईटकर, उपाध्यक्ष शरद सावळे, सचिव रितेश बोंदरे, सहसचिव लोकेश मते, विष्णू कांबळे, भानुदास बांडाबुमो, अरविंद जगनाडे, जयकिसन मते, विनोद जिभोरे, संजय पिंजियो, रमेशराव धांडे, प्रविण बांते, विजय ढवकर, उमेश हलमारे, उर्मिलाबाई शेंडे, माधुरी गाडवे, गौरव बांते, संगीता शेलेज्ञरी, गणेश शिंघुळकर, रवींद्र उरकुडे, पांडुरंग बांडाबुमो, गोवर्धन कानतोडे, सुधाकर ढमबोडे, प्रदीप लाकडे, अरुण शेंडे, मंगला कानतोडे, रंजना कांतोरे, रेणुका सपाटे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button