विदेही संत कचरूजी महाराज जन्मोत्सवात प्रा.मोहन इंगळे यांचे भावस्वरांजली भक्ती संगीत

अमरावती/5 एप्रिल-ओमकार परब्रम्ह स्वामी समर्थ श्री कचरूजी महाराज यांच्या जन्मोत्सव निमित्त विविध समाजपयोगी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून भागवत सप्ताह , किर्तन, महाआरती , श्री ची पालखी महा शोभायात्रा आणि महाप्रसाद इत्यादी आयोजनासोबतच विदर्भातील प्रसिद्ध पार्श्र्वगायक संगीतकार कवी प्रा मोहन दादारावजी इंगळे यांच्या भावस्वरांजली संगीत ग्रुप द्वारे समाज प्रबोधनात्मक , राष्ट्रीय एकात्मता, जातीय सलोखा ,देशप्रेम , भक्ती भाव असा संगीतमय आशयगर्भ निवेदन युक्त भक्ती संगीत कार्यक्रम 7 एपिल 2026 ला रात्री 8 वाजता विदेही संत कचरूजी महाराज सेवा आश्रम म्हैसांग जिल्हा अकोला चे विश्वस्त पदाधिकारी पुजारी हितचिंतक यांनी आयोजित केलेला आहे.
या कार्यक्रमात प्रस्तुतकर्ता गायक प्रा मोहन इंगळे यांच्या समवेत निवेदक दिलीप सरदार, कीबोर्ड प्रविण जोंधळे , ऑक्टोपॅड संतोष मानकर, तबला अभिषेक लोखंडे , अशोकराव देशमुख , गावंडे इत्यादी आपली सेवा देणार आहेत.तेव्हा पंचक्रोशीतील माऊली भक्तांनी संगीत प्रेमींनी गावकरी मंडळींनी कार्यक्रमास आपली उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष मिलींद देशमुख, सुरेश देशमुख , सी.डी गावडे अशोक देशमुख पुजारी यांनी केली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button