गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याकरिता शिक्षण सभापती यांचा पुढाकार
इयत्ता दहावी मधील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार

अमरावती/13 मे- महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी गुणवत्तेही पुढे असल्याचे दिसून येत असून इयत्ता दहावीच्या निकालामध्ये महानगरपालिकेत शाळांनी बाजी मारली असल्याचे दिसून येत आहे.
यामध्ये काही शाळांचा निकाल शंभर टक्के लागला असून 14 माध्यमिक शाळा मधील अधिक टक्केवारी घेऊन गुणवत्ता प्राप्त करणार्या विद्यार्थ्यांचा नुकतीच शिक्षण सभापती प्रीतीताई रेवणे यांनी शाळेत जाऊन सत्कार केला. तसेच विद्यार्थिनींना पुढील भविष्यासाठी व प्रगतीसाठी शुभेच्छा देऊन मार्गदर्शन सुद्धा केले. इयत्ता दहावी मध्ये केवळ शिक्षकांच्या अध्यापन मार्गदर्शनाच्या भरोशावर व स्वतः घेतलेल्या मेहनतीच्या भरोशावर ज्या मुलींनी 90% पेक्षा जास्त गुण प्राप्त केले अशा दोन विद्यार्थिनी कुमारी मोमीना तनवीर अहमद तस्किन , अलीना उरूज अब्दुल मतीन यांचा जमील कॉलनी हायस्कूल येथे कार्यक्रमावेळी शिक्षण सभापती एड. प्रीतीताई रेवणे, शाळा निरीक्षक योगेश पखाले, मुख्याध्यापक अब्दुल सईद , हाफिझ सर , समिना सुलताना, अरशिया कौसर, शाळा व्यवस्थापन समिती मधील डॉक्टर झाहिद नय्यर, सादिक सर, आतीक सर,सिद्दिकी मॅडम, दुरे शेहवार मॅडम व पालकांच्या उपस्थितीमध्ये पुष्पगुच्छ देऊन सत्कार पार पडला. अतिशय गरीब कुटुंबातील विद्यार्थिनींनी शिक्षण क्षेत्रात आपल्या मेहनतीच्या जोरावर घेतलेल्या गरुड झेप बद्दल शिक्षण सभापती यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक यावेळी केले.




