सुनेत्रा पवार यांना ‘झेड प्लस’ सुरक्षा व्यवस्था
गृह मंत्रालयाला सूचना, महायुती सरकारची विशेष खबरदारी

मुंबई /5 फेब्रुवारी : महाराष्ट्राच्या नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘झेड प्लस’ दर्जाची सुरक्षा मिळणार आहे. याविषयीचा निर्णय राज्य सरकारने घेतला. याआधी खासदार असताना पवार यांना ‘एक्स’ दर्जाची सुरक्षा होती. मात्र, उपमुख्यमंत्रिपदी शपथ घेतल्यानंतर पवार यांच्या सुरक्षेची विशेष खबरदारी राज्य सरकारकडून घेण्यात येत आहे.
अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर सुनेत्रा पवार यांना शनिवार, 31 जानेवारी रोजी उपमुख्यमंत्रिपदी शपथ देण्यात आली. पवार यांच्याकडे तीन खातीही सोपविण्यात आली असून, मंत्रालयात अजित पवार यांच्या वापरातील दालनेही त्यांच्या कार्यालयासाठी मंगळवारी प्रदान करण्यात आली. पुणे आणि बीड हे राज्याच्या राजकारणातील महत्त्वाच्या जिल्ह्यांचे पालकमंत्रिपदही त्यांच्याकडे सोपविण्यात आले. त्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या सुरक्षेचा आढावा राज्य सरकारकडून घेण्यात आला असून, त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला सुनेत्रा पवार यांना यापुढे ‘झेड प्लस’ दर्जाची सुरक्षा मिळणार असून, त्याविषयीच्या सूचना गृह विभागाला देण्यात आल्या आहेत. सुनेत्रा पवार या आठवड्याच्या अखेरीस किंवा पुढील आठवड्यात पदाचा कार्यभार स्वीकारणार असल्याचे समजते.द,ध,न आणि न+ अशा सरकारकडून देण्यात येणार्या सुरक्षेच्या विविध श्रेणी आहेत.




