शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून गोळीबार
सुरक्षा रक्षकासह दोघे जखमी वाराणसी विमानतळावर खळबळ

कमलेश रायला घेतलं ताब्यात
वाराणसी /16 ऑगस्ट : शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक कमलेश राय यांनी त्यांच्या बंदुकीतून दोन राउंड गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. वाराणसी विमानतळावर ही घटना घडली. कमलेश राय आणि त्यांची पत्नी वाराणसी विमानतळामधून मुंबईसाठी निघाले होते. यावेळी वाराणसी विमानतळावर परवानाधारक बंदुकीतून त्यांनी गोळीबार केला. पिस्तुल तपासणीदरम्यान माजी नगरसेवक कमलेश राय यांच्याकडून गोळी सुटल्याची माहिती मिळत आहे.
वाराणसी एअरपोर्ट मध्ये बंदूक लॉक करत असताना माजी नगरसेवक कमलेश राय यांच्या बंदुकीतून दोन राउंड फायरिंग झाले आहेत. वाराणसी एअरपोर्ट परिसरात गोळीबार झाल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचा वातावरण निर्माण झाले आहे. एअरपोर्ट सुरक्षा रक्षकाने कमलेश रायला ताब्यात घेऊन चौकशी करत आहेत. दरम्यान, विमानतळावर गोळीबार झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. काही काळा प्रवाशांमध्ये देखील भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी तातडीन कमलेश रायला ताब्यात घेतलं असून चौकशी सुरु करण्यात आली आहे.
प्रवासी कमलेश केदारनाथ राय यांच्याकडे 7.62 मिमी पिस्तुल होते. पिस्तुलासोबत 21 जिवंत काडतुसे असल्याची माहिती मिळाली आहे. एअर इंडिया एक्स्प्रेसच्या खद 1810 विमानाने ते मुंबईला जाणार होते. सकाळी सुमारे साडेनऊ वाजता शस्त्र तपासणीदरम्यान बंदुकीतून गोळ्या सुटल्याची घडली घटना आहे. गोळी रिकोशेट होऊन दोन सुरक्षा तपासणी कर्मचार्यांना दुखापत झाली आहे. यामध्ये रोहित राज आणि सुमन कुमारी यांना दुखापत झाली आहे.




