3 लाख 55 हजार पात्र शेतकर्‍यांची दुसरी यादी जाहीर

पुणे/11 सप्टेंबर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकर्‍यांची आधार प्रमाणीकरणासाठीची दुसरी यादी शुक्रवारी (दि.11) प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे 41 हजार आणि व्यापारी बँकांचे 3 लाख 14 हजार मिळून एकूण 3 लाख 55 हजार 614 शेतकर्‍यांचा समावेश आहे. या याद्या बँकांच्या शाखा, ग्रामपंचायतीमध्ये लावण्यात येणार आहेत. शेतकर्‍यांनी याद्यांमध्ये आपले नांव तपासून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी केले आहे. दुसर्‍या यादीतील शेतकर्‍यांनी दिनांक 31 मार्च 2026 रोजीची कर्ज थकबाकीची रक्कम तपासूननजीकच्या ‘आपले सरकार सेवा केंद्रा’मध्ये जाऊन आधार प्रमाणीकरण करावे. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर कर्जमुक्तीची रक्कम संबंधित शेतकर्‍यांच्या कर्ज खात्यावर जमा करण्यात येणार आहे.

Back to top button