मंत्री शिरसाटांच्या घराबाहेर रिक्षाचालकांचे आंदोलन
गॅसचा पुरवठा होत नसल्याचा आरोप

संभाजीनगर/29 मार्च – पश्चिम आशियातील संघर्षामुळे आपल्या वाहनांसाठी गॅसचा पुरवठा होत नसल्याचा आरोप करत, अनेक रिक्षाचालकांनी रविवारी मंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने केली. गेल्या काही दिवसांपासून इंधन पंपांवर रांगा लावूनही इंधन मिळत नसल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या शिरसाट यांना आपली ही बिकट अवस्था कळावी, यासाठी त्यांनी अशा प्रकारचे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे रिक्षाचालकांनी सांगितले. यावर मंत्री शिरसाट यांनी जिल्हा पुरवठा अधिकार्यांशी संपर्क साधला आणि रिक्षाचालकांना मदत करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. या रिक्षाचालकांना गेल्या चार दिवसांपासून इंधन मिळालेले नाही. या चालकांना त्रास देणार्या इंधन पंपांवर कारवाई करा. त्यांचे परवाने रद्द करा, असे शिरसाट यांनी जिल्हा पुरवठा अधिकार्यांना सांगितले.




