आज पंतप्रधान मोदी महाराष्ट्र दौर्‍यावर

मुंबईकरांना मिळणार ’दुहेरी भेट’!

* 37,270 कोटींचा मुंबई मेट्रो -3 प्रकल्प देशाला करणार समर्पित

मुंबई/7 ऑक्टोबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 आणि 9 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राच्या महत्त्वपूर्ण दौर्‍यावर येत आहेत. या दौर्‍यात ते मुंबई आणि नवी मुंबईतील अंदाजे 37,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या दोन महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. यामध्ये नवी मुंबईतील नवे आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मुंबई मेट्रो मार्गिका-3 या प्रकल्पांचा समावेश आहे.

पंतप्रधान मोदी 8 ऑक्टोबर रोजी मुंबईत दाखल होतील. दुपारी 3 वाजता ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पाहणी करतील आणि नंतर लगेच 3:30 वाजता या विमानतळाचे औपचारिक उद्घाटन करतील. ‘भारताला जागतिक विमान वाहतूक केंद्र’ बनवण्याच्या संकल्पनेनुसार सुमारे 19,650 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या या विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे. सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून विकसित केलेले हे देशातील सर्वात मोठे ‘हरित क्षेत्र विमानतळ’ आहे. हे विमानतळ छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळासोबत मुंबई महानगर प्रदेशासाठी दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून काम करेल, ज्यामुळे गर्दी कमी होण्यास मदत होईल आणि मुंबईला जागतिक दर्जाच्या बहु-विमानतळ प्रणालीत स्थान मिळवता येईल.

संबंधित बातम्या

Back to top button