आ.भारसाकळेंना बिश्नोई गँगची धमकी; 2 कोटी खंडणीची मागणी
अकोल्यात पोहोचली बिश्नोई गँग, शुभम लोणकरचा फोन

अकोला/19 फेब्रुवारी – बिश्नोई गँगकडून अकोल्यातील भाजपच्या बड्या नेत्याला खंडणीसाठी धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. सिग्नल पद्वारे भाजपच्या पदाधिकार्याला बिश्नोई गँगमधील शुभम लोणकर याच्याकडून 2 कोटी खंडणीसाठी धमकी आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बिश्नोई गँगने 2 कोटी रूपयां खंडणी मागितली आहे. अकोट मतदारसंघांचे भाजपचे आमदार प्रकाश भारसाकळे यांच्याकडून 2 कोटी वसूल करून दे, अशी भाजपच्या शहराध्यक्षाला दिली धमकी. अत्यंत गोपनीय पद्धतीने आलेल्या धमकी संदर्भात अकोला पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.
भाजपचे शहराध्यक्षला पोलिसांची सुरक्षा मिळाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. साधारणत तीन ते चार दिवसांपूर्वी त्यांना धमकीचा कॉल आला होता. आमदार भारसाकडे यांच्याकडून दोन कोटी रुपये वसूल करून द्यावे, अन्यथा तुला आणि आमदाराला पाहून घेईल, अशी धमकी बिश्नोई गँगमधील शुभम लोणकर याने भाजपच्या शहराध्यक्षाला दिली असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या संदर्भात जास्त माहिती नसल्याचं अकोला पोलिसांकडून सांगितण्यात आलं. असं असलं तरी आकोट शहरात अकोला पोलिसांचे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे. या आधी राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची आणि आता रोहीत शेट्टीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी शुभम लोणकर याने स्वीकारली होती. शुभम लोणकर हा मूळ अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील नेव्होरी गावाचा रहिवासी आहेय. या आधीही शुभम लोणकर याच्यावर अकोला पोलिसांनी कारवाई करत तब्बल 3 पिस्टलसह काही जिवंत काडतूस त्याच्याकडून जप्त केल्या होत्या. लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा लहान भाऊ अनमोल बिश्नोई यांच्या संपर्कात असणार्या शुभम लोणकरला बंदुकीच्या तस्करी प्रकरणात अकोला पोलिसांनी गजाआड केले होते. शुभम हा बंदूक तस्करीचा मुख्य सूत्रधार होताये.अकोट पोलिसांनी त्याच्याकडून बंदूक खरेदी करणार्या तिघांना बेड्या ठोकल्या होत्या. ’तो’ गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यातील वार्जे शहरात रहायचा, त्यानंतर तो फरार होता. त्यावेळी शुभमला पुण्यातून अटक झाली होती त्यानंतर त्याची जमिनावर सुटका झाली होती. शुभम लोणकर आणि लॉरेन्स बिश्नोई या दोघांच्या संभाषणाचं कॉल रेकॉर्डिंग पोलिसांकडे आहे. शुभमचे नेटवर्क दुबई आणि इतर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांपर्यंत पसरले आहेये. त्यांचं अकोल्यातील नेव्होरी गांवात घर असून त्याच्या घराला अनेक दिवसांपासून कुलूप लागलं आहेय. तर रोहित शेट्टीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी देखील शुभम लोणकर याने स्वीकारली होती.




