खरातसोबत संबंध, फोटो असलेल्या नेत्यांचीही चौकशी होणार
मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा

नाशिक/24 मार्च – अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्या प्रकरणी सध्या अटकेत असलेला भोंदू ज्योतिषी अशोक खरात याच्या कुकृत्यांचा पाढा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधिमंडळात मांडला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अशोक खरातवर कठोर कारवाईचे संकेतही दिले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावेळी उद्धवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी अशोक खरातसोबत संबंध आणि फोटो असलेल्या अधिकारी, नेतेमंडळींचीही चौकशी होणार का असा प्रश्न उपस्थित केला.
त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी सूचक फडणवीस पुढे म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी करत असलेल्या एसआयटीचं प्रमुख आपण जाणीवपूर्वक एका महिला अधिकार्याला केलं आहे. यातील संवेदनशीलता लक्षात घेऊन, एका महिला अधिकार्याला आपण एसआयटीचं प्रमुख केलं आहे. तसेच त्यांचा ट्रॅक रेकॉर्डही चांगला आहे. त्यामुळे या प्रकरणात आपण कुणालाही मागे घालणार नाही. खरात याला कुणी थेट मदत केली असेल, कुणी अप्रत्यक्ष मदत केली असेल, तरी त्याला आपण धडा शिकवू, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले. विधान केलं आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अध्यक्ष महोदय, या प्रकरणामध्ये ज्या ज्या व्यक्तीविरोधात पुरावा मिळेल, त्या प्रत्येकाची आम्ही चौकशी करू. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, आपण सगळे राजकारणात आहोत. त्यामुळे कुणाचाही फोटो कुणासोबतही येतो हे आपण पाहिलेलं आहे. नुसता फोटो कुणासोबतही आहे, म्हणून एखाद्याला आरोपी करता येणार नाही, पण आता आपण डिलिटेड डेटाही काढत आहोत. त्यामुळे डिलिटेड डेटामध्ये कुणाचा संपर्क होता का? कुणी व्यवहार केला आहे का, कुणी मेसेज केले आहेत का? या गोष्टीत जो कुणी असेल, त्याची चौकशी केली जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगित
विधानसभेत मुख्यमंत्री म्हणाले, खरातने योनीत बोट घातले, लघवी पाजली-अशोक खरात प्रकरणाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत माहिती दिली. खरात विरोधात एकूण पाच गुन्हे दाखल झाले असल्याची माहिती फडणवीसांनी दिली. एसआयटी तपासात शिर्डी पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यात जप्त असलेल्या व्हिडीओच्या आधारे त्यातील पीडित महिला निष्पन्न करून, त्यांना बोलावून त्यांची चौकशी करण्यात आली आहे. आरोपी अशोक खरात याचे भोंदूगिरी व जादूटोणा करून लैंगिक अत्याचार बळी पडलेल्या चार पीडित महिलांना निष्पन्न केले आहे. त्या चार पीडित महिलांचे जबाब नोंदवून घेऊन व एका साक्षीदाराने त्याच्या पत्नीबद्दल घडलेल्या प्रकरणातील गुन्हा, असे पाच स्वतंत्र गुन्हे नोंदवण्यात आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सरकारवाडा पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. नोव्हेंबर 2023 ते डिसेंबर 2025 या कालावधीत ओकस प्रॉपर्टी येथे आरोपी अशोक खरातने वाघ दाखवून भीती घातली तिच्या कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी दिली. त्याच्या कार्यालयात अडचणी घेऊन येणार्या लोकांकडून मंदिराच्या खात्यावर पैसे घेतले. तसेच मिरगाव येथील ईशान्येश्वर मंदिरात सात नकली वाघ दाखवून भीती घातली, तसेच कार्यालयात येणार्या महिलांना लघवी पाजून अघोरी प्रकार केले, असे खरातचे प्रताप फडणवीसांनी विधानसभेत सांगितले. दुसर्या एका प्रकरणाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 7 ऑक्टोबर 2024 ते 12 ऑक्टोबर 2024 च्या दरम्यान सकाळी 11 वाजता ओकस प्रॉपर्टी कॅनडा कॉर्नर येथे तक्रारदार महिला आणि तिचा पती हे अशोक खरातला भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी अशोक खरात याने महिलेच्या पतीला बाहेर पाठवले. अशोक खरातने तक्रारदाराच्या पत्नीस गरोदरपणात करावयाच्या धार्मिक विधीचे कारण सांगून तिच्या पोटावर, छातीवर हात फिरवून, तिच्या योनीत बोट घालून तिच्यावर बलात्कार केला.
मी तुझी शुद्धी केली आहे-अशोक खरात याने नंतर पीडित महिलेच्या हातात एक काळा दगड ठेवला आणि तिच्या कानात मंत्र पुटपुटला. तिच्या डोक्यावर, पाठीवर, छातीवर हात फिरवला. तिला लज्जा वाटेल असे कृत्य केले. ’तू घाबरू नकोस, तू माझ्या औरामध्ये आहेस, माझ्यात दैवी शक्ती आहे. मी तुला स्पर्श केल्याने तुझे कल्याण होणार आहे. मी तुझी शुद्धी केली आहे. तू झालेला प्रकार कोणाला सांगितला, तर तुझ्यावर देवाचा कोप होईल’, असा दम महिलेला दिला, अशी माहिती फडणवीसांनी विधानसभेत सांगितले. ’माझ्याशी संबंध ठेवल्यामुळे तू शुद्ध झालीस’ फडणवीस म्हणाले, चौथ्या प्रकरणातील गुन्ह्यात एप्रिल 2022 ते डिसेंबर 2024 या कालावधीत तक्रार महिलेला मुलगा व्हावा आणि तिची कौटुंबीक अडचण सुटावी, यासाठी तिला आरोपी अशोक खरात याने वेळोवेळी ओकस प्रॉपर्टी कॅनडा कॉर्नर येथे बोलावून तिला तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्यास दिले. पेढा खायला दिला. तिला गुंगी आल्यानंतर त्याचा फायदा घेऊन तिच्याशी जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले. अशोक खरात त्या महिलेला म्हणाला की, मी देवाचा अवतार आहे. माझ्याशी संबंध ठेवल्यामुळे तू शुद्ध झाली आहेस. तुझ्या सर्व अडचणी दूर होणार आहे. आणि हे जर तू कोणाला सांगितले तर देव तुझ्यावर कोपेल. तुझे चांगले होणार नाही, असा दम खरातने त्या महिलेला दिला, असेही फडणवीसांनी विधानसभेत सांगितले.




