महागाई भत्त्यात 2 टक्क्यांची वाढ
राज्यात सरकारी कर्मचार्यांची चांदी!

महागाई भत्ता पोहोचला 60 टक्क्यांवर
मुंबई/11 मे– राज्यातील सरकारी कर्मचार्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने 1 जानेवारी 2026 पासून केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्यात 2 टक्क्यांची वाढ केली. त्यानंतर आता राज्य सरकारनेही महगाई भत्यात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयानंतर महागाई भत्त्यात 2 टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे महागाई भत्ता 58 टक्क्यांहून 60 टक्के झाला आहे.
राज्य सरकारने महागाई भत्ता वाढविण्याचा निर्णय घेतल्याने कर्मचार्यांना दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रातील राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकार्यांना लाभ मिळणार आहे. लाखा शासकीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना थेट लाभ मिळणार आहे. याआधी शासकीय कर्मचार्यांना 58 टक्के दराने महागाई भत्ता मिळत होता. त्यात आता 2 टक्क्यांची भर पडली आहे. त्यामुळे महागाई भत्ता 60 टक्क्यांवर पोहोचला आहे.ही वाढीव महागाई भत्त्याची वाढ कर्मचार्यांच्या मासिक वेतनात पदनिहाय आणि वेतन श्रेणीनुसार होईल. कर्मचार्यांकडून अनेक दिवसांपासून मागणी केली जात होती,त्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारने महागाईचा भत्ता वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या उपरोक्त नमूद कार्यालयीन ज्ञापनानुसार 1 जानेवारीपासून लागू करण्यात आलेला 2 टक्के वाढीव दराने महागाई भत्ता आणि ज्ञापनात नमूद इतर तरतूदी महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकार्यांना लागू राहणार आहेत. त्यामुळे 1 जून 2026 पासून 60 % दराने महागाई भत्ता अनुज्ञेय राहील.




