मुंबईत सीजेपीचे 2 ऑक्टोबरला जेल भरो आंदोलन

सीजेपी’च्या आंदोलनाला परवानगी नाकारली

मुंबई /28 सप्टेंबर : केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या दिवशी मुंबईतून देशव्यापी आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली होती. दादर येथील शिवाजी पार्कमध्ये हे आंदोलन करण्यासाठी पक्षाने मुंबई पोलिसांकडे परवानगी मागितली. मात्र, शिवाजी पार्क पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. परवानगी नाकारल्यानंतर सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी जेल भरो आंदोलनाचा इशारा दिला आहे.
सीजेपीचे राष्ट्रीय संघटन प्रमुख अजिंक्य शिंदे यांनी शिवाजी पार्क पोलिसांना पत्र देऊन शांततापूर्ण आंदोलन करण्याची परवानगी मागितली. मात्र, 27 सप्टेंबर रोजी शिवाजी पार्क पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद पवार यांनीपरवानगी नाकारण्याचे पत्र दिले. शिवाजी पार्क मैदानाचा खेळाव्यतिरिक्त अन्य कारणांसाठी वापर करण्यावर उच्च न्यायालयाने 4 जानेवारी 2013 रोजी दिलेल्या आदेशानुसार निर्बंध असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

Back to top button