राज्यातील 5 सनदी अधिकार्‍यांच्या बदल्या

गेल्या 3 आठवड्यात झाले फेरबदल

मुंबई /15 एप्रिल: देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सूत्र हाती घेतल्यापासून राज्यात सनदी अधिकार्‍यांच्या बदल्यांची परंपरा सुरु झाल्याची चर्चा आहे. गेल्या फक्त 23 दिवसांमध्ये बदल्यांचीही तिसरी वेळ आहे. या काळात 46 सनदी अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. बुधवारी (15 एप्रिल) राज्यातील 5 बड्या सनदी अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. डॉ. बी. एन. पाटील, संचालक, पर्यटन, मुंबई यांची प्रकल्प संचालक, रुसा, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मुंबई येथे झाली बदली मंगेश जोशी, उपमहासंचालक, यशदा, पुणे यांची संचालक, पर्यटन, मुंबई येथे झाली बदली कुलदीप जंगम, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर यांची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पिंपरी येथे झाली बदली कुशल जैन, प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी, अहेरी आणि सहायक जिल्हाधिकारी, अहेरी उपविभाग, गडचिरोली यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर येथे बदली करण्यात आली.सध्या धाराशिव जिल्ह्यातील भूम उपविभागात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेले ख-ड रेवैया डोंगरे यांची पांढरकवडा (यवतमाळ) येथे खढऊझ प्रकल्प अधिकारी आणि केळापूर उपविभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button