कृषी अन् दुग्ध क्षेत्रात कुठलिही तडजोड नाही

अमेरिकेसोबत ट्रेड डीलवर पियुष गोयल यांची माहिती

नवी दिल्ली/4 फेब्रुवारी – अमेरिकेने भारतीय आयातीवरील शुल्क 18 टक्क्यांपर्यंत कमी करणार्‍या एका व्यापार कराराची घोषणा केली असली तरी, अमेरिकेसाठी भारत किती शुल्क कमी करण्यास सहमत झाला आहे, याबद्दल काही अस्पष्टता अजूनही कायम आहे. भारत रशियासोबतचा तेल व्यापार थांबवेल, अशा डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याला भारताने अद्याप दुजोरा दिलेला नाही. अर्थ संक ल्पीय अधिवेशन दर म्यान वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी लोकसभेतव्यापार करारात अन्न आणि शेतीविषयक चिंतांकडे पूर्ण लक्ष देताना भारताने कृषी आणि दुग्ध व्यवसाय सारख्या संवेदनशील क्षेत्रांचे यशस्वीपणे संरक्षण केल्याची ग्वाही दिली. त्यांनी म्हटले की ही भागीदारी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजक, कुशल कामगार आणि उद्योगांसाठी नवीन संधी निर्माण करेल, द्विपक्षीय संबंध मजबूत करेल, ‘विकसित भारत 2027’ च्या दृष्टिकोनाला पाठिंबा देईल आणि 140 कोटी भारतीयांसाठी ऊर्जा सुरक्षा सर्वोच्च प्राधान्य राहील याची खात्री करेल.

संबंधित बातम्या

Back to top button