शिंदेंची गटनेतेपदी नियुक्तीच उद्धव ठाकरेंनी केली होती

सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद

शवसेना पक्ष व चिन्हाची सुनावणी 4 ऑगस्टला

नवी दिल्ली /30 जुलै : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी जून 2022 मध्ये बंडखोरी करत शिवसेनेचे 40 आमदार फोडले होते. या घटनेला आता चार वर्षे पूर्ण झाली आहेत. तर याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी फेब्रुवारी 2023 मध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयात मागील 3 वर्षांपासून याप्रकरणी सुनावणी सुरू असून अद्याप निकाल लागलेला नाही. दरम्यान, आज (30 जुलै) सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा सुनावणी पार पडली असून अ‍ॅड. दीपक चटप यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
माध्यमांशी संवाद साधताना ड. दीपक चटप यांनी सांगितले की, कपिल सिब्बल यांनी न्यायालयात युक्तीवाद केला. त्यांनी सांगितले की, बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर 2013 मध्ये उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून निवड झाली होती. तसेच पक्षाच्या बैठकीत उद्धव ठाकरे हेच प्रमुख असायचे. त्या बैठकीत एकनाथ शिंदे देखील उपस्थित असायचे. मात्र त्यानंतर बंडखोरी झाली. त्यामुळे सूरत आणि गुवाहाटी संदर्भात देखील सिब्बल यांनी न्यायालयात सांगितले. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदेंना पक्ष आणि चिन्ह दिला. तेव्हा 2018 ची शिवसेनेची घटना आयोगाने लक्षात घेतली नाही. यासंदर्भात निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर मुख्य कागदपत्रे अपलोड आहेत. तसेच विधी मंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष याकडे दुर्लक्ष करता कामा नये, असे दोन मुद्दे कपिल यांनी न्यायालयात मांडले, अशी माहिती अ‍ॅड. दीपक चटप यांनी दिली.दरम्यान, दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सर्व युक्तिवाद लेखी स्वरूपात सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच याप्रकरणी पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष व चिन्हाचा निकाल आता 4 ऑगस्ट रोजी तरी लागणार का? आणि शिवसेना पक्ष व चिन्ह उद्धव ठाकरेंना मिळणार की, एकनाथ शिंदेंकडे जाणार, याकडे संपूर्ण राज्योच लक्ष लागून राहणार आह

संबंधित बातम्या

Back to top button