2.79 लाख कोटींच्या पॅकेजला मंजुरी

मोदी सरकारचे शेतकर्‍यांसाठी 3 मोठे निर्णय

सहा रब्बी पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ

नवी दिल्ली/30 सप्टेंबर  : महाराष्ट्रात भीषण परिस्थिती असून जवळपास 45 दिवस पावसाने ओढ दिली आहे. राज्यातील खरीप हंगाम देखील वाया गेल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील तब्बल 265 तालुक्यांमध्ये म्हणजेच 75 टक्के दुष्काळ जाहीर केला आहे. महत्त्वाचे म्हणजे राज्यातील दुष्काळाची झळ केंद्रापर्यंत पोहचली असून दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती स्वत: केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली. यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत शेतकर्‍यांच्या दृष्टीने सहा रब्बी पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज (30 सप्टेंबर) झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी, ऊर्जा क्षेत्र आणि दिल्लीतील वाहतूक व्यवस्था यांबाबत तीन महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी देण्यात आली. या बैठकीत 2027-28 या वर्षासाठी रब्बी हंगामातील पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यात आली. याव्यतिरिक्त, ‘ग्रीन एनर्जी कॉरिडॉर’च्या (हरित ऊर्जा मार्गिका) तिसर्‍या टप्प्याला मंजुरी देण्यात आली, ज्याचा उद्देश अक्षय ऊर्जा राष्ट्रीय ग्रीडमध्ये समाविष्ट करणे हा आहे. तसेच, दिल्लीसाठी ‘इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ लागू करण्याबाबतही निर्णय घेण्यात आला. या निर्णयांचा कृषी आणि ऊर्जा क्षेत्रापासून ते दैनंदिन प्रवासापर्यंतच्या विविध क्षेत्रांवर परिणाम होण्याची अपेक्षा आहे.

पकांचे नवीन एमएसपी दर
गहू : 2,610 रुपये प्रति क्विंटल
ज्वारी : 2,286 रुपये प्रति क्विंटल
हरभरा : 5,958 रुपये प्रति क्विंटल
मसूर : 7,390 रुपये प्रति क्विंटल
मोहरी : 6,613 रुपये प्रति क्विंटल
करडई : 7,215 रुपये प्रति क्विंटल

Back to top button