प्रफुल पटेलांची मोदी, शहांसोबत गुप्त बैठक

नवी दिल्ली/3 फेब्रुवारी  : राज्यात एकीकडे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू असताना दुसरीककडे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. प्रफुल पटेल यांनी मोदी आणि शाहांची स्वतंत्र भेट घेऊन त्यांच्याशी पाच ते सहा मिनिटे चर्चा केल्याची माहिती आहे. या चर्चेमध्ये नेमकं काय घडलं याचा तपशील मात्र समोर आला नाही.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची जोरदार चर्चा सुरू झाल्याचं दिसतंय. दिल्लीत संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यानिमित्त एनडीएच्या सर्व खासदारांची एक बैठक घेतली आणि त्यांना संबोधित केलं. त्यावेळी मोदींनी अजित पवारांनाही श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर प्रफुल पटेल हे मोदी आणि अमित शाहांना भेटले.प्रफुल पटेल यांनी आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली. अजित पवार असताना दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू होती. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी आणि अमित शाहांनी त्याला ग्रीन सिग्नल दिला होता अशी माहिती समोर आली होती.

संबंधित बातम्या

Back to top button