इराणच्या सुरक्षा दलांसह नेत्यांवरही इस्रायलचे हल्ले
किमान 787 लोकांचा मृत्यू

* युद्ध महिनाभर चालेल- डोनाल्ड ट्रम्प
नवी दिल्ली/4 मार्च – अमेरिका आणि इस्रायलने इराणची राजधानी तेहरानसह अन्य शहरातील आपले हल्ले सुरू ठेवले असून युद्धाच्या पाचव्या दिवशी इराणच्या सुरक्षा दलांसह वरिष्ठ नेत्यांनाही या संयुक्त कारवाईत लक्ष्य केले जाऊ लागले आहे. तर या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी इराणकडून इस्रायल आणि आजूबाजूच्या प्रदेशांमध्ये क्षेपणास्त्रे आणि ड्रोन चा स्वैर मारा केला जाऊ लागला आहे.
आज पहाटेपासून इराणची राजधानी तेहरामध्ये ठिकठिकाणी बॉम्बस्फोट होत असल्याची दृश्येर सरकारी वृत्तवाहिनीवरून दाखवली जात होती. राजधानीच्या मध्यभागात एक मोठी इमारत उद्ध्वस्त झाल्याचे या दृश्याामध्ये दाखवण्यात आले. कोम आणि अन्य काही शहरांनाही अशाच प्रकारे लक्ष्य करण्यात आले. या शहरांवरून लढाऊ विमाने घोंघावत जात असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. युद्ध किमान महिनाभर चालेल असा अंदाज अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्तवला असून आतापर्यंत या युद्धात 800 लोक मारले गेले आहेत. त्यात इराणच्या नेत्यांचीही भर पडेल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये इराणमध्ये किमान 787 लोकांचा मृत्यू झाला आहे. संघर्ष सुरू झाल्यापासून इस्रायलमध्ये अकरा लोक मारले गेले आहेत, असे रेड क्रेसेंट सोसायटीने म्हटले आहे. कुवेतमध्ये शुएबा बंदरावर इराणने केलेल्या ड्रोन हल्ल्यात अमेरिकेचे 6 सैनिक मारले गेले आहेत.
इराणचे लढाऊ विमान पाडले-इराणच्या हवाई दलाचे वायएके-130 लढाऊ विमान पाडल्याचा दावा इस्रायलच्या लष्कराने केला आहे. इराणकडून डागल्या जात असलेल्या क्षेपणास्त्रांपासून सुरक्षेसाठी इस्रायलने आपली हवाई संरक्षण प्रणाली सक्रिय केली आहे. प्रणालीने इराणची अनेक क्षेपणास् 6 आणि ड्रोन हवेतच रोखली. त्यामुळे जेरुसलेमच्या परिसरात स्फोटांचे अनेक आवाज ऐकायला येत होते.आंतरराष्ट्रीय पातळीवर तेलाची वाहतूक करणार्या पर्शियन आखाताचे चिंचोळे तोंड असलेल्या होर्मूझ समुद्रधुनीला इराणने बंद केले असल्यामुळे ब्रंट क्रूडचे भाव प्रति बॅरल 84 डॉलर इतके वाढले आहेत. संघर्षाला सुरुवात झाल्यापासून क्रूडच्या किंमतीत 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जुलै 2024 पासून ही दरवाढ सर्वात जास्त प्रमाणातली आहे.




