दूरदर्शनच्या वृत्तनिवेदिका सरला माहेश्वरी यांचे निधन

नवी दिल्ली/12 फेब्रुवारी -दूरदर्शनच्या सुवर्णकाळातील प्रसिध्द वृत्तनिवेदिका सरला माहेश्वरी यांचे निधन झाले आहे. त्यांच्या जाण्यामुळे भारतीय टीव्ही पत्रकारितेतील एक गौरवशाली पर्व संपल्याचे मानले जात आहे, तर चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. सरला माहेश्वरी साधेपणा, स्पष्ट उच्चार आणि विश्वासार्हतेसाठी ओळखल्या जात होत्या, ज्यामुळे त्यांनी अनेक दशके प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप सोडली. त्यांच्या निधना मुळे टेलिव्हिजन क्षेत्राला मोठे नुकसान झाले आहे. ऑल इंडिया महिला काँग्रेसने ट्विटरवर त्यांना आदरांजली अर्पित केली आहे. सरला यांच्या कामातील निष्ठा, विश्वासार्हता आणि शालीनता येणार्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.




