घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ

नवी दिल्ली/7 जून-महागाईची झळ दिवसेंदिवस तीव्र होत असल्याचे चित्र आहे. यातच आता सर्वसामान्यांना आणखी एक मोठा झटका बसला आहे. घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार एलपीजी सिलेंडरचा भाव 29 रुपयांनी वाढला आहे. गेल्या तीन महिन्यांतील ही दुसरी दरवाढ आहे. या ताज्या दरवाढीमुळे दिल्लीत 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 913 रुपयांवरून 942 रुपये झाली आहे. आज सकाळपासून नवे दर लागू झाले आहेत. स्थानिक कर आणि वाहतूक खर्चातील फरकामुळे सिलेंडरचे दर प्रत्येक शहरानुसार वेगळे असतील. याआधी 7 मार्च 2026 रोजी सिलिंडरचे दर 60 रुपयांनी वाढले होते. आखाती देशात सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक तेल आणि वायू पुरवठ्यात ताण येत असतानाच ही दरवाढ करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button