बड्या अधिकार्यासह 4 जवानांचा मृत्यू
सीआयएसएफ कॅम्पमध्ये अंदाधुंद गोळीबार

नवी दिल्ली/29 सप्टेंबर – जम्मू-काश्मीरमधील कठुआत सीआयएसएफ कॅम्पमध्ये एका जवानानं सहकार्यांवर अंदाधुंद गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत 4 जवानांचा मृत्यू झालाय. हा गोळीबार का करण्यात आला? यामागचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही. या घटनेची चौकशी सुरू आहे.
गोळीबार प्रकऱणी सीआयएसएफ मुख्यालयातून कोर्ट ऑफ इन्क्वॉयरीचे आदेश देण्यात आलेत. आज संध्याकाळी साधारण 7 वाजून 10 मिनिटांनी ही घटना घडली. कठुआ जिल्हा पोलिसांचं एक पथक घटनास्थळी पोहोचलंय. मृत्यू झालेल्या चार जणांमध्ये असिस्टंट कमांडंट रँकच्या अधिकार्याचा आणि एका सब-इन्स्पेक्टरचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. गोळीबार प्रकरणी गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
गोळीबाराची ही घटना बसोली येथील मश्का भागातील सेवा पॉवर प्रोजेक्टच्या सीआयएसएफ कॅम्पमध्ये घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू केलाय. प्राथमिक माहितीनुसार, जवानांमध्ये ड्युटी लावण्यावरून बाचाबाची झाली होती. हा वाद इतका विकोपाला गेली की याचं रूपांतर गोळीबारात झाले. प्राथमिक माहितीनुसार, ही घटना एका वीज प्रकल्पाच्या संरक्षणासाठी तैनात असलेल्या सीआयएसएफ (उखडऋ) तुकडीच्या छावणीत घडली. गोळीबारात चारही सैनिक गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले, पण उपचारावेळी मृत्यू झाला.





