राम मंदिर देणगी चोरीच्या 105 घटना उउढत मध्ये कैद

SIT तपास अहवालाचा तपशील सुप्रीम कोर्टात सादर

25 सप्टेंबरपर्यंत आरोपपत्र दाखल करणार

नवी दिल्ली/21 सप्टेंबर-अयोध्या येथील राम मंदिरात देणगी चोरीच्या 105 घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांमध्ये कैद झाल्याख आहेत, अशी माहिती आज (दि. 21) सर्वोच्च न्यायालयाला देण्यात आली. देणगी चोरीचा तपास करणार्‍या विशेष तपास पथकाच्या (डखढ) अहवालाचा संदर्भ देत सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाला तपासाचा तपशील सादर केला. एसआयटीचा तपास अंतिम टप्प्यात असून 25 सप्टेंबरपर्यंत आरोपपत्र (चार्जशीट) दाखल केले जाईल, अशी माहितीही सॉलिसिटर जनरल यांनी न्यायालयाला दिली. न्यायालयाने दंडाधिकार्‍यांना (मॅजिस्ट्रेट) कायद्यानुसार आरोपपत्रावर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
कथित देणगी चोरीशी संबंधित प्रकरणाची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने एसआयटीच्या अहवालाचा आढावा घेतला. सुनावणीदरम्यान, आतापर्यंत झालेली अटक आणि देणगी चोरीबाबत गोळा केलेले पुरावे याबद्दल न्यायालयाला माहिती देण्यात आली; तसेच उपलब्ध पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात आले.सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदारांचे जबाब आणि इतर पुराव्यांशी संबंधित तपशीलही सादर करण्यात आले.आरोपींची ओळख पटवण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर साहित्याचे विश्लेषण कसे केले गेले, याचा तपशील या अहवालात नमूद करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सादर केलेली सर्व माहिती नोंदीवर घेतली आहे.
सीसीटीव्ही फुटेजद्वारे देणगी चोरीच्या 105 घटनांची ओळख पटली-अहवालात पुढे स्पष्ट करण्यात आले की, मौल्यवान वस्तूंच्या पावत्या सॉफ्टवेअरद्वारे तयार केल्या जातात. यानंतर त्या वस्तू स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लॉकरमध्ये ठेवल्या जात आहेत. एसआयटीच्या अहवा लातून असे समोर आले दाखल करणारकी, सीसीटीव्ही फुटेजद्वारे देणगी चोरीच्या 105 घटनांची ओळख पटली आहे. दर्जा उंचावण्यासाठी चार स्वायत्त मंडळांची स्थापना-आरोग्यसेवेचा दर्जा उंचावण्यासाठी आणि कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी या परिषदेअंतर्गत चार महत्त्वपूर्ण स्वायत्त मंडळांची स्थापना केली जाणार आहे.

Back to top button