सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू तीन विद्यार्थिनींची प्रकृती गंभीर
फडणवीसांच्या एका कॉलवर वेगाने धावली यंत्रणा

एअरलिफ्ट करत नागपूरला हलवलं
जपतलाई येथील खासगी आश्रमशाळेत धक्कादायक घटना
गडचिरोली /10 ऑगस्ट स्थानिक जिल्ह्यातील एका खाजगी अनुदानित आश्रमशाळेत मध्यरात्री घडलेल्या अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटनेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर तीन विद्यार्थिनींची प्रकृती गंभीर आहे. जखमी विद्यार्थिनींपैकी 11 वर्षीय विद्यार्थिनीची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने तातडीने हालचाली करत तिला हेलिकॉप्टरद्वारे नागपूरला एअरलिफ्ट केले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील एका खाजगी अनुदानित आश्रमशाळेत मध्यरात्री घडलेल्या अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटनेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर तीन विद्यार्थिनींची प्रकृती गंभीर आहे. जखमी विद्यार्थिनींपैकी 11 वर्षीय विद्यार्थिनीची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने तातडीने हालचाली करत तिला हेलिकॉप्टरद्वारे नागपूरला एअरलिफ्ट केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जपतलाई येथील खाजगी अनुदानित आश्रमशाळेत सर्व विद्यार्थिनी मध्यरात्री झोपलेल्या ही दुर्घटना घडली. एका विषारी सापाने 6 विद्यार्थिनींना दंश केला. मुलींनी आरडाओरड केल्यानंतर आश्रमशाळा प्रशासनाच्या ही बाब लक्षात आली. घटनेचे गांभीर्य ओळखून जखमी मुलींना तातडीने गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रुग्णालयात उपचार सुरू असताना दुर्दैवाने तीन विद्यार्थिनींची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. उर्वरित तीन विद्यार्थिनींवर गडचिरोली येथे तातडीने वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले.जखमी विद्यार्थिनींपैकी 11 वर्षीय दीपिका बिलकुरासाय मडावी हिची प्रकृती उपचारादरम्यान अधिकच चिंताजनक झाली. विष शरीरात पसरल्याने तिची स्थिती नाजूक बनली होती. गडचिरोली येथील डॉक्टरांनी तिला तात्काळ पुढील उपचारासाठी नागपूरला हलवण्याचा सल्ला दिला.दीपिकाची गंभीर स्थिती पाहता रस्त्याने प्रवास करणे धोक्याचे ठरले असते. त्यामुळे गडचिरोली जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाने अजिबात वेळ न दवडता तातडीने विशेष हेलिकॉप्टरची व्यवस्था केली.




