मुद्रांक शुल्कात मोठी सूट

फडणवीस सरकारनं घेतले 8 धडक निर्णय

मुंबई/11 ऑगस्ट – देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आत 8 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. महसूल, कृषी, उच्च शिक्षण, सहकार आणि विधी व न्याय विभागांशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण प्रस्ताव मंजूर करण्यात आले. भूसंपादनाच्या व्याजात सुधारणा, नवीकरणीय ऊर्जेसाठी मुद्रांक शुल्कात सूट, त्याशिवाय नवीकरणीय ऊर्जेला मोठा दिलासा देण्यात आला आहे.
आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या या बैठकीत भूसंपादनाचा मोबदला विलंबाने दिल्यास मिळणार्‍या व्याजदरात सुधारणा करण्यासाठी 2013 च्या कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, राज्यात नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी जमीन हस्तांतरणावरील मुद्रांक शुल्कात पूर्ण माफी आणि खरेदी केलेल्या जमिनीच्या हस्तांतरण शुल्कात 25 टक्के सूट देण्याचा मोठा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे.भूसंपादनाचा मोबदला विलंबाने अदा झाल्यास, देण्यात येणार्‍या व्याज दरांत सुधारणा. भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, 2013 चे कलम 72 मध्ये सुधारणा करण्यात येणार.

संबंधित बातम्या

Back to top button