रेल्वे उड्डाणपूल कामामुळे बेलपुरा मार्ग बंद

रेल्वे स्टेशनकडून राजापेठकडे जाणारी वाहतूक वळवली

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाचे आवाहन

अमरावती /26 नोव्हेंबर : शहरातील रेल्वे उड्डाणपुलाच्या सुरू असलेल्या बांधकामामुळे रेल्वे स्थानकाकडून राजापेठकड े जाणारा अत्यंत वर्दळीचा बेलपुरा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये व संभाव्य अपघात टाळता यावेत, यासाठी प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला असून नागरिकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अमरावती शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम सध्या अतिशय वेगाने सुरू आहे. या पुलाच्या पुढील टप्प्यातील कामासाठी मुख्य रस्त्यावर मोठी यंत्रसामग्री उभी करावी लागणार आहे. त्यामुळे रेल्वे स्थानक ते राजापेठ या दरम्यानचा महत्त्वाचा बेलपुरा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठ ेवणे गरजेचे होते. हा रस्ता शहराच्या मध्यवर्ती भागांना जोडणारा असल्याने येथे दिवसभर वाहनांची मोठी गर्दी असते. काम सुरू असताना नागरिकांच्या जिवितास कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी हा रस्ता बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला. बेलपुरा मार्ग अचानक बंद झाल्यामुळे सकाळच्या सत्रात कामावर जाणारे नोकरदार, व्यापारी तसेच शाळा आणि महाविद्यालयांत जाणार्‍या विद्यार्थ्यांची काही प्रमाणात धावपळ उडाली. अनेक वाहनचालकांना या बदलाची पूर्वकल्पना नसल्याने त्यांना माघारी परतावे लागले. सध्या या मार्गावर ठिकठिकाणी फलक लावून रस्ता बंद असल्याची सूचना देण्यात आली आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी वाहतूक विभागाने नियोजन केले आहे. प्रवाशांनी कोंडीत अडकू नये म्हणून पर्यायी मार्गांचा वापर करणे आवश्यक आहे. उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईपर्यंत हा बदल कायम राहणार असून अमरावतीकर नागरिकांनी आणि वाहनचालकांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली आहे.

बेलपुरा रस्ता बंदमुळे पर्यायी मार्गाचे नियोजन

बेलपुरा मार्ग वाहतुकीसाठी बंद केल्यामुळे प्रवाशांनी शहरातील इतर जोड रस्त्यांचा वापर करावा. रेल्वे स्थानकाकडून राजापेठकडे जाणार्‍या दुचाकी व चारचाकी वाहनचालकांनी जयस्तंभ चौक किंवा इतर जवळच्या मुख्य रस्त्यांवरून प्रवास करावा. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अवजड वाहनांना या भागात प्रवेश नाकारण्यात आला असून चौकाचौकांत वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

Back to top button