मेळघाटच्या जंगलावर अदानी समूहाची नजर
डॉ.सुनील देशमुख यांचा सरकारवर थेट हल्लाबोल

4800 नोकर्यांचे आश्वासन केवळ धुळफेक असल्याचा दावा
अमरावती/20 नोव्हेंबर – विकासाच्या नावाखाली महायुती सरकारने निसर्गाची उघड लूट मांडली असून, उद्योगपती अदानी समूहाची गिधाडी नजर आता मेळघाटच्या समृद्ध वनसंपदेवर पडली असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेस नेते डॉ. सुनील देशमुख यांनी केला आहे. प्रस्तावित 1500 मेगावॅटच्या जलविद्युत प्रकल्पामुळे मेळघाटचे अरण्य उद्ध्वस्त होणार असून, 4800 स्थानिकांना रोजगार देण्याचे गाजर केवळ डोळ्यांत धुळफेक करणारे असल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील आड नदी, जामली आणि भांडारी परिसरातील तब्बल 240 हेक्टर वनजमिनीवर हा प्रकल्प उभारला जाणार आहे. या भागातील दुर्मिळ वनस्पती, वन्यजीवांचा अधिवास आणि आदिवासींचे नैसर्गिक जीवन या प्रकल्पामुळे मुळापासून उखडले





