उत्तमसरा येथे महिला आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
शेकडो महिलांची आरोग्य तपासणी

अमरावती /3 जून: आयुष्मान आरोग्य मंदिर उत्तमसरा तर्फे दिनांक 3 जून, मंगळवारला, ग्रामपंचायत उत्तमसरा येथेभव्य स्त्रीरोग शिबिर आयोजित करण्यात आले होते. तसेच 12 ते 49 वयोगटातील स्त्रियांची रक्त तपासणीचे शिबिरही आयोजित करण्यात आले होते.यावेळी शेकडो स्त्रियांनी लाभ घेतला.
3 जूनला आयुष्मान आरोग्य मंदिर उत्तम सरा आणि ग्रामपंचायत उत्तमसरांकडून भव्य स्त्रीरोग शिबिर आणि रक्त तपासणी शिबिर तसेच छउऊ कॅम्प घेण्यात आला यामध्ये एकूण 60 स्त्रियांची बीपी शुगर, हिमोग्लोबिन तपासणी तसेच इतर आजारावर तपासणी करण्यात आली आणि त्यांना औषधोपचार करण्यात आला. आणि संदर्भ सेवा देण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात सरपंच धर्मेंद्र महारे आणि उपसरपंच श्रीमती संगीता मानकर यांच्या हस्ते करण्यात आले तसेच स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर पल्लवी बागवाले आणि त्यांची हॉस्पिटलची जमू, समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर सोनाली देशमुख, आरोग्य सेवक अमित नर्सिंगकर आरोग्य सेविका शारदा हिरेखन, कुमारी मंगला वानखेडे, आशा सुरेखा सवयी, श्रीमती संगीता निंभोरकर, झढ- श्रीमती सविता शिंदे , अंगणवाडी सेविका जयश्री बेडेकर, ग्रामपंचायत सदस्य अमित बेडेकर, शिवम अवचार , पल्लवी राऊत,उठझ मुक्ता कांबेया सर्वांनीकार्यक्रमाच्या यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.





