डॉ. भावना भुतडा यांना नागरिकांची पसंती

दर्यापूर नगर परिषद निवडणुकीत मशाल चिन्हाला जोरदार पाठिंबा

दर्यापूर/1 डिसेंबर -दर्यापूर नगर परिषद निवडणुक आज मंगळवार 2 डिसेंबर रोजी होत असून मतदानासाठी संपूर्ण शहर निवडणूकीसाठी सज्ज झाल आहे. नवा उमेदवार नवी दिशा असा बदल आणि विकासाची हमी या दिशेने वाटचाल होत, निवडणुकीत नवीन उमेदवारांनी उडी घेतल्याने शहरात व नागरिकांमध्ये उत्साह दिसून येत आहे.
शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ठोस भूमिका मांडत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या डॉ. भावना भुतडा या नगरसेवक पदासाठी मैदानात आहेत. त्यांच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून विविध प्रभागांत भेटीगाठीदरम्यान मतदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. शहराच्या विकास कामांमध्ये गती, मूलभूत सुविधा आणि प्रामाणिक प्रशासन यावर भर देत त्यांनी आपल्या कामकाजाची दिशा स्पष्ट केली आहे. नागरिकांच्या अपेक्षांना प्रतिसाद देणारा पर्याय म्हणून त्यांचे नाव पुढे येत असून तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व स्तरांतील लोकांचे समर्थन त्यांना मिळत आहे. दर्यापूरच्या विकासासाठी सक्षम पर्याय कोण, यावर चर्चा रंगलेल्या असताना डॉ. भावना भुतडा यांच्याकडे मतदार आशेने पाहत आहेत. आज 2 डिसेंबर रोजी होणार्‍या मतदानात त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाल्याने मतदार सुद्धा आशेने पाहत आहेत.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button