बिबट्याला त्वरीत जेरबंद करा
तालुका काँग्रेसची मागणी

* तहसीलदारांसह वनविभागाला निवेदन
तिवसा /1 डिसेंबर : तालुक्यातील शेंदुर्जना बाजार, वाठोडा, भांबोरा,पालवाडी, बनसापुर यासह इतर शेत शिवारामध्ये व गावालगत बिबट्याचा वावर वाढत असून बिबट्याने अनेक पाळीव प्राण्यांवर सुद्धा हल्ला केल्याच्या घटना सामोरं येत आहे.यामुळे शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण असून बिबट्याच्या भीतीमुळे शेतीच्या ओलीताचे कामे देखील ठप्प आहे.त्यामुळे वन विभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा तसेच विज महावितरण विभागाने या भागातील शेतकर्यांना दिवसा विज पुरवठा करावा अशी मागणी तिवसा तालुका काँग्रेस कमिटीने निवेदनातून केली आहे.तसेच शिरजगाव मोझरी, मालधूर, पालवाडी,तिवसा शे. बाजार यासह इतर भागातील नादुरुस्त असलेली डीपी, ट्रान्सफार्मर तातडीने दुरुस्त करावे अशी मागणी देखील करण्यात आली. यावेळी मागणीचे निवेदन तहसीलदार, विजवितरण तसेच वनविभागाकडे देण्यात आले. या प्रसंगी तालुका अध्यक्ष वैभव स.वानखडे, लुकेश केने, योगेश वानखडे, अमर वानखडे, सुनिल बाखडे, विशाल सावरकर, चंद्रशेखर ठाकूर,विवेक देशमूख,वैभव ढवळे, विजय कुरळकर, प्रशांत कांबळे,किसन मुंदाने,विश्वजीत बाखडे, गजानन भोंबे, नरेंद्र विघ्ने,हरिभाऊ गजबे, पांडुरंग खेडकर, सुधीर बोके, स्वप्नील तुरकाने, प्रमोद वानखडे, नितिन मेहकरे, एजाज खान, प्रफुल वानखडे, अमोल पन्नासे, वैभव काकडे, अनिकेत बादशे,अनिकेत तालन, अक्षय पवार, अनंत शेंद्रे, गौरव चौधरी, आकाश मकेश्वर आदी पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या ठिकाणी पाच किलोमीटर नंतर जंगल भाग असून तो अगदी लहान भाग आहे.त्यामुळे हा बिबट शेत शिवारात शिरत आहे. शेतकर्यांच्या सुरक्षेतेच्या दृष्टिकोनाने आम्ही महावितरणला दिवसा वीज पुरवठा करण्यासंदर्भात पत्र दिले आहे. दि. 30रोजी शे बाजार येथे शेतकर्यांची बैठक बोलवून त्यांचे म्हणे ऐकून घेतले आम्ही या भागात पिंजरा, ट्रेप कॅमेरा, तसेच एक गस्त पथक तैनात केले आहे.
-अमोल चौधरी, वनपरिक्षेत्र अधिकारी तिवसा -मोर्शी.




