चिखलदर्‍याचे खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेत चमकले

महाराष्ट्राची मान अभिमानाने

चिखलदरा/28 नोव्हेंबर – उत्तराखंडमध्ये दिमाखात सुरू असलेल्या 28 व्या अखिल भारतीय वन क्रीडा स्पर्धेच्या पटांगणावर गुरूवारी इतिहास घडला. चिखलदरा वन प्रशिक्षण संस्थेच्या जिद्दी आणि निडर प्रशिक्षणार्थींनी आपली क्रीडाज्योत राष्ट्रीय स्तरावर चेतवली आणि संपूर्ण महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली.
या स्पर्धेत 4400 मीटर रिलेमध्ये निखिल छगन दनाने याने सुवर्ण पदक पटकावले. 5 हजार मीटर धावणेमध्ये संकेत मसने याने रौप्य व 1500 मीटर धावणेमध्ये कांस्य पदक प्राप्त केले. व्यंकटेश शिंदे याने 800 मीटर धावणेमध्ये कांस्य पदक तर नेहा पिंगळे हिने 800 मीटर धावणे व 4100 मीटर रिलेमध्ये कांस्य पदक प्राप्त केले. याचप्रमाणे समिका मंचेकर हिने 400 मीटर धावणे व 4100 मीटर रिलेमध्ये कांस्य पदके पटकावली. तसेच सायली टोनपे हिने 4100 मीटर रिलेलध्ये कांस्य पदकाची कमाई केली. कवायत शिक्षक सुधीर आकेवार यांचे परिपूर्ण मार्गदर्शन, सहायक प्रशिक्षक महादेव धुर्वे व नितीन बघाय यांचे अथक परिश्रम यांनी या चमूला केवळ क्रीडा क्षेत्रात नाही तर जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर उभे राहण्याइतके सामर्थ्य दिले. विजयी चमूचे यश पाहून वन प्रशिक्षण संस्थेच्या संचालिका मुक्ता टेकाळे अत्यंत भावूक होत म्हणाल्या की ही मुले फक्त आमच्या संस्थेची नाहीत तर ते चिखलदर्यामचे, महाराष्ट्राचे आणि देशाच्या वनसेवेचे अभिमान आहेत. त्यांच्या परिश्रमाने आज आमचे शिर अभिमानाने उंचावले आहे, असे सांगून त्यांनी प्रशिक्षणार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करीत त्यांच्या कठोर परिश्रम, शिस्त, समर्पण आणि सामर्थ्याला मोठी दाद दिली.

पदक यश – चिखलदरा वीरांचा गौरवप्रशिक्षणार्थी 

निखिल दनाने – स्वर्ण/ संकेत मसने – रौप्य/संकेत मसने- कांस्य
व्यंकटेश शिंदे – कांस्य/नेहा पिंगळे – कांस्य/नेहा पिंगळे – कांस्य
समिका मंचेकर- कांस्य/ समिका मंचेकर -कांस्य/सायली टोनपे -कांस्य

संबंधित बातम्या

Back to top button