पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज जिल्हा दौर्‍यावर

परतवाडा, मोर्शी व शेंदूरजनाघाट येथे सभा व प्रचार रॅली

अमरावती /26 नोव्हेंबर – येत्या 2 डिसेंबर रोजी होणार्‍या नगरपरिषद व नगरपंचायत निवड णुकांचा विचार करून राज्याचे महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उद्या, 27 नोव्हेंबर रोजी अमरावती जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत आहेत. या दौर्‍यात ते विविध नगरपालिका क्षेत्रांना भेट देत नगराध्यक्ष व सदस्य पदांसाठी उभे असलेल्या भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत.
माहितीनुसार, पालकमंत्री बावनकुळे उद्या सकाळी प्रथम परतवाडा येथे पोहोचतील. सकाळी 11 वाजता नेहरू मैदानात आयोजित प्रचार सभेला ते संबोधित करतील तसेच जुळ्या शहरात भाजपतर्फे काढण्यात येणार्‍या प्रचार रॅलीत सहभागी होतील.
त्यानंतर ते दुपारी 2 वाजता मोर्शी येथे पोहोचून तेथील नगर परिषद निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या प्रचारा साठी आयोजित रॅली व सभेत सहभागी होतील. यानंतर दुपारी सुमारे 4 वाजता त्यांचे शेंदूरजनाघाट येथे आगमन होईल. या नगरपरिषद क्षेत्रातील नगराध्यक्ष व सदस्य पदांसाठी उमेदवारी असलेल्या भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी ते रॅली व सभेद्वारे जनसंपर्क साधतील. कार्यक्रमानंतर ते रस्तेमार्गे नागपूरकडे प्रस्थान करतील.

संबंधित बातम्या

Back to top button