मनपाच्या मतदार यादीवर भाजप शहराध्यक्ष डॉ.धांडे यांचा आक्षेप
खा. डॉ. बोंडे यांच्या नेतृत्वात मनपा आयुक्तांना निवेदन

* अनेक प्रभागातील नावांमध्ये घोळ’
* नागरिकांना कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन
अमरावती /24 नोव्हेंबर – भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांनी महानगर पालिकेच्या प्रारूप मतदार यादीत मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचे सांगुन नागरिकांना कार्यालायत संपर्क साधण्याचे आवाहन केले. तसेच खा. डॉ. अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने सोमवारी मनपा आयुक्त यांची भेट घेवून प्रारुप मनपा मतदार यादीच्या घोळाबाबत माहिती दिली. भाजप शिष्टमंडळाने मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांच्याशी चर्चा करुन विविध प्रभागातील मतदार यादीशी त्यांची नावे जुळत नसल्याचे निदर्शनास आणून दिले. यावेळी निवडणुक अधिकारी अक्षय निलंगे यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली. माहिती देतांना त्यांनी सांगितले की, संत गाडगेबाबा-पीडीएमसी वॉर्ड क्रमांक 2 मध्ये पॅराडाईज कॉलनी, भीमनगर आणि सिद्धार्थनगर सारखे भाग जोडले गेले आहेत. नवसारी वॉर्डमध्येही अचानक हजारो मतदार वाढले आहेत. सुतगिरणी वॉर्डमधील 40,000 हून अधिक जास्तीच्या मतदारांबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. मतदार यादी महानगरपालिकेने जाहीर केलेल्या वॉर्ड रचनेशी जुळत नाही असा आक्षेेप त्यांनी केला. डॉ. नितीन धांडे म्हणाले की, भाजपला शहराच्या सर्व भागातून मतदार यादींबद्दल तक्रारी येत आहेत. भाजप या तक्रारी महानगरपालिका आणि निवडणूक विभागाकडे सादर करत आहे. भाजप सर्व तक्रारींचे निराकरण करण्यात येईल. डॉ. नितीन धांडे म्हणाले की, प्रारुप मतदार यादीतील घोळाची तातडीने नियुक्ती करण्यात यावी अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल. सर्व मतदार याद्या महानगरपालिकेने जाहीर केलेल्या अंतिम प्रभाग रचनेनुसार होईपर्यंत भाजप पाठपुरावा करत राहील, असे त्यांनी सांगितले. डॉ. धांडे यांनी जनतेला मतदार यादीतील त्यांची नावे तपासण्याचे आणि त्यांची नावे ज्या विभागात राहतात त्या प्रभागाशी जुळतात याची खात्री करण्याचे आवाहन केले.




