गळफास घेऊन इसमाची आत्महत्या
सावरखेड पिंगळाई येथे येथील घटना

मोर्शी /24 नोव्हेंबर : नजीकच्या सावरखेड पिंगळाई येथे सोमवारी दुपारी बारा वाजताचे दरम्यान सावर खेड पिंगळाई मेन रोडला लागून गुरांचे दवाखान्याजवळ झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. सदर घटनेबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून मृतक राजू चरमनसिंग चितोडिया वय 36 वर्षे रा. केशवनगर भुसावळ जि. जळगाव येथील रहिवासी असून दोन दिवसापूर्वी सावरखेड पिंगळाई येथे नातेवाईकांचे शोधात आला होता. परंतु त्याला कोणीच न ओळखल्यामुळे तो चिंताग्रस्त परिस्थितीमध्ये साफल्य विद्यालयाचे गेट समोर दोन दिवस थांबला होता. बाजूने चितोडिया परिवाराची वस्ती आहे त्याला कोणीच न ओळखल्यामुळे चिंताग्रस्त होऊन आज दुपारी बारा वाजता त्याने मेन रोडच्या बाजूने झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली . शिरखेड पोलिसांना फोन द्वारे माहिती मिळाल्याने शिरखेड ठाणेदार ईश्वर वर्गे तातडीने घटनास्थळी पोहोचले असून ठाणेदार ईश्वर वर्गे यांचे मार्गदर्शनात पोलीस जमादार सचिन भाकरे .पो.काँ निस्ताने .गाडी चालक पो.काँ. विजया वानखडे यांनी तातडीने घटना स्थळाला भेट देऊन घटनेचा पंचनामा करून आकस्मित मृत्यूची नोंद केली .सदर मृतकाचे पी .एम मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले असून घटनेचा तपास शिरखेड पोलीस करीत आहे




