मुख्य आरोपीसह अल्पवयीन गुन्हेगार दोन तासात ताब्यात
विलास नगरातील खून प्रकरणात शहर गुन्हेशाखा व गाडगे नगर पोलीसाची महत्वाची कामगिरी

अमरावती / 20 नोव्हेंबर – विलास नगरातील संविधान नगर येथे यश पाटणकर यांच्या वर जुन्या वादावरून घडलेल्या खुनाच्या गंभीर प्रकरणात अमरावती शहर गुन्हे शाखा व गाडगे नगर पोलीसांच्या संयुक्त कारवाईत अवघ्या दोन तासांत मुख्य आरोपीसह अल्पवयीन सहभागीला जेरबंद करत महत्वाची कामगिरी बजावली. पोलिसांच्या या तात्काळ कारवाईमुळे परिसरातील दहशतीचे वातावरण काहीसे कमी झाले आहे. या प्रकरणात 19 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी विलास नगर भागात खून झाल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती.
तत्काळ पथकांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. चौकशीतून उघड झाले की, आरोपींमध्ये रागारागातून वाद झाला व त्यातून हा गंभीर प्रकार घडला. या प्रकरणात परस्परांचा जीव घेण्याच्या उद्देशाने संशयितांनी धारदार शस्त्रांचा वापर केला होता. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संभाव्य हालचालींचा मागोवा घेत आरोपींचा शोध सुरू केला. काही तासांच्या अथक पाठपुराव्यानंतर पथकाने मुख्य आरोपीला पकडले, तर त्याच्या सोबत असलेल्या अल्पवयीन गुन्हेगारा लाही सुरक्षितरीत्या ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी ताब्यात घेतलेले संशयित 1.प्रिन्स भागचंद श्रीवास(वय 18) – रा. विलास नगर, अमरावती व 2 विधी संघर्षीत बालके यांचा हत्या केलेल्या आरोपी मध्ये समावेश आहे.सदर आरोपींनी गुन्ह्याची कबुली सुद्धा दिली असल्याचे परिसूत्रांनी स्पष्ट केले आहे. अमरावती पोलिस आयुक्त श्री. अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त गणेश शिंदे, सहाय्यक पोलिस आयुक्त रमेश धुमाळ, पोलीस उपयुक्त शाम घुगे साहेब पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांचे नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक अमोल कडू पोलीस निरीक्षक महेश इंगोले सहायक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत कासार व त्यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या केली. आरोपींना पुढील तपासासाठी तपास अधिकार्यांकडे सुपूर्द करण्यात आले असून, शस्त्रसह अन्य पुरावेही जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांच्या तातडीच्या आणि अचूक कारवाईमुळे या गुन्ह्याचा गुंता अत्यल्प वेळात सुटला असून, शहर पोलिसांच्या दक्षतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.




