मनी लाँड्रिंग प्रकरणात नवाब मलिक दोषी!

मुंबई– राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांना मुंबई सत्र न्याया लयाने मोठा धक्का दिला आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात नवाब मलिकांविरोधात आरोप निश्चित करण्यात आले आहेत. या प्रकरणात नवाब मलिक यांना 2022 मध्ये अटक करण्यात आली होती आणि सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. प्रकरणात दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर, सलीम पटेल, 1993 च्या मुंबई स्फोटाचा आरोपी सरदार खान आणि नवाब मलिक यांनी गोवावाला कम्पाउंडमधील मुनीरा प्लंबर या महिलेची तीन एकर जमीन कट रचून बळकावल्याचा आरोप होता. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष एमपी एमएलए कोर्टात विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या कोर्टासमोर प्रकरणाची सुनावणी झाली. नवाब मलिकांच्या वकिलांनी कोर्टात सांगितले की, या प्रकरणासंबंधी मुंबई हायकोर्टाकडे काही आवश्यक कागदपत्रे ईडीकडून मागितली आहेत.
धुळे: दोंडाईचा वरवाडे नगरपरिषदेच्या निवडणुकीत मोठा राजकीय उलथापालथ झाली असून भाजपच्या उमेदवार नयनकुवर रावल यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्या राज्याचे मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री असून भाजपकडून नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार होत्या.यासोबतच भाजपचे आणखी सात नगरसेवकही बिनविरोध निवडून आल्याने दोंडाईचा नगरपरिषद निवडणुकीत भाजपचे वर्चस्व कायम राहिले आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार शरयू एकनाथ भावसार यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांवर महानगरपालिकेचा कर थकवल्याचा आरोप करत भाजपकडून त्यांच्या उमेदवारीवर हरकत घेण्यात आली होती.

संबंधित बातम्या

Back to top button