नगर परिषद निवडणुकीच्या छाननीत 1624 अर्ज वैध

12 नगरपरिषदांचा अहवाल जाहीर ; 314 अर्ज बाद

अमरावती / 18 नोव्हेंबर : नगर परिषद व नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी दाखल झालेल्या नामनिर्देशन अर्जांची छाननी प्रक्रिया सोमवारी पूर्ण झाली. जिल्ह्यातील 12 नगरपरिषदांमधून अध्यक्ष आणि सदस्य पदांसाठी दाखल झालेल्या अर्जांपैकी एकूण 314 अर्ज अवैध, तर 1624 अर्ज वैध ठरल्याची माहिती निवडणूक विभागाने जाहीर केली.
छाननीपूर्व दाखल अर्जांची संख्या मोठी असली तरी अनेक ठिकाणी अपूर्ण कागदपत्रे, नियमांचे अपुरे पालन आणि इतर तांत्रिक कारणांमुळे अर्ज बाद झाल्याचे समजते. तथापि, बहुतांश नगरपरिषदांमध्ये बहुकोनी सामना रंगण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. प्रत्येक नगरपरिषदेनुसार वैध अर्जांची स्थिती पुढीलप्रमाणे -नांदगाव खंडेश्वर : अध्यक्ष 11, सदस्य 78, धारणी : अध्यक्ष 13, सदस्य 88, शेंदुर्जना घाट : अध्यक्ष 06, सदस्य 87, चिखलदरा : अध्यक्ष 05, सदस्य 53, चांदूर बाजार : अध्यक्ष 07, सदस्य 111, चांदूर रेल्वे : अध्यक्ष 06, सदस्य 99, मोर्शी : अध्यक्ष 11, सदस्य 153, वरूड : अध्यक्ष 11, सदस्य 122, धामणगाव रेल्वे : अध्यक्ष 03, सदस्य 52, दर्यापूर : अध्यक्ष 07, सदस्य 127, अचलपूर : अध्यक्ष 16, सदस्य 314, अंजनगाव सुर्जी : अध्यक्ष 12, सदस्य 232 अध्यक्ष पदासाठी एकूण 108 वैध, तर सदस्य पदासाठी 1516 वैध अर्ज असल्याने अनेक प्रभागांमध्ये चुरस वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. छाननीनंतर दावेदावा – हरकतींची अंतिम मुदत पूर्ण होताच उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर होईल. त्यानंतर निवडणुकीचा प्रचारवेग आणखी वाढणार आहे. निवडणुकीची रणधुमाळी तापू लागली असून स्थानिक पातळीवर मतदार, कार्यकर्ते व पक्षांच्या तंबूंमध्येही चर्चांना ऊत आला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button