11 तर 26 नगरसेवक पदाकरिता तब्बल 133 उमेदवार रिंगणात
वरुड नगरपरिषदेत नगराध्यक्षपदाकरीता

वरुड । 18 नोव्हेंबर – संपुर्ण तालुक्यात राजकीय दृष्टीने महत्वपुर्ण समजल्या जाणार्या वरुड नगरपरिषदेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसपर्यंत नगराध्यक्षपदाकरीता 14 तर नगरसेवक पदाकरीता 169 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. आज उमेदवारी अर्ज छाणणीनंतर नगराध्यक्षपदाच्या नामांकनापैकी 3 अवैध ठरले तर नगरसेवक पदाकरीता प्राप्त 169 पैकी 36 उमेदवारी अर्ज अवैध ठरले त्यामुळे नगराध्यक्षपदाकरता 11 तर नगरसेवक पदाकरीता 133 उमेदवार निवडणुक रिंगणात उरले आहेत. दरम्यान उद्या 19 पासुन 21 नोव्हेंबर पर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेता येणार असून त्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे. विशेष म्हणजे भाजपाकडून आपणाच उमेदवारी मिळणार, या आशेने अनेकांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केले होते परंतु अनेकांना भारतीय जनता पार्टीची उमेदवारी न मिळाल्याने व वेळेपर्यंत बी फॉर्म सादर न करु शकल्याने वरुड नगरपरिषदेमध्ये अवैध नामांकनाची संख्या अधिक झाल्याचे दिसून आले. नगराध्यक्षपदाकरीता धर्मेंद्र मनिराम उईके, सुनिल किसनाजी तुमराम, तुषार मारोतराव धुर्वे, प्रशांत प्रल्हादराव धुर्वे, अशोक पुनाजी पंधरे, चेतना राहूल बेलसरे, सुनिल नथ्थुजी वटके, सिमा अनिलराव सयाम, ईश्वर शिवकुमार सलामे, दिपांशु दिपक सलामे, निलेश सुभाषराव सिरसाम यांचा समावेशआहे. प्रभाग क्र.1 अ छाया सुरेश दुर्गे, पुजा प्रभु नरहरे, निता सुशिल बेले, प्रभाग क्र.1 ब अक्षय सुधाकर तागडे, सौरभ सुशिल तिवारी, सागर प्रदीप धोटे, निलेश सुरेशराव बेलसरे, शेख असलम शेख करीम प्रभाग क्र.2 अ कविता नरेंद्र उपरकर, निता ज्ञानेश्वर चिमोटे, सुलभा श्रीराम बहुरुपी, माला जगदीश वानखडे, प्रभाग क्र.2 ब भारत जगन्नाथ खासबागे, विनय ज्ञानेश्वर खासबागे, भुषण शिवहरी गोळे, सुभाष भिमराव धांदे, प्रमोद माधवराव भोंगाडे, जितेंद्र संजय माकोडे प्रभाग क्र.3 अ हेमलता रविंद्र कुबडे, पुष्पा मुरलीधर पवार, प्रज्ञा नंदकिशोर बोडखे, सुनिता प्रविण रडके, प्रभाग क्र.3 ब संजय गोविंदराव आगरकर, भुदेव रामभाऊ काळे, संदीप मधुकर केंडे, संदीप विष्णु देवते, अक्षय ज्ञानेश्वर निंभोरकर, उमेश मधुकर निंभोरकर, प्रणव प्रमोद बोंडे, प्रविण पांडुरंग रडके प्रभाग क्र.4 अ अशोक कृष्णराव गडलिंग, रोशन सुरेश गायकवाड, अभिषेक सुभाष जाधव, निलेश रामकृष्ण दुर्गे, राजेश अशोक मदने, प्रभाग क्र.4 ब प्रियंका नितीन घुरैया, निता तानाजी नाकट, लिना जगदीश शिरभाते, ज्योती दुर्गादास शेगेकर
प्रभाग क्र.5 अ मनिषा शंभु उईकें, शिल्पा सरोदी उईके, रंजना मंगेश एडमे, भारती नत्थुजी वटके, प्रभाग क्र.5 ब इकराम शाह रज्जाक शाह, तारेश विष्णुपंत देशमुख, संतोष संपतराव निमगरे, राजु अण्णाजी बांबल, जयंत माणिकराव म्हस्की, सुनिल रामदास हाडे
प्रभाग क्र.6 अ सिमा विलास उघडे, अनिता दिगांबर पराते, अंजुम बानो हारुण शाह, प्रभाग क्र.6 ब जुबेर खॉ अख्तर खॉ पठाण, मोहसीन बेग सलीम बेग, देवेंद्र भाऊराव बोडखे, रफीक शाह दिलावर शाह, राजेंद्र साहेबराव शिरस्कर
प्रभाग क्र.7 अ रेखा राजेंद्र काळे, अनिता फुलोर देशमुख, वर्षा प्रमोद भोंगाडे, प्रभाग क्र.7 ब गोपाल सुरेश अढाऊ, पृथ्वीराज राजु काळे, देवेंद्र प्रल्हादराव खेरडे, लिलाधर महादेवराव पाटील
प्रभाग क्र.8 अ गौरव पुरुषोत्तम इंगळे, पराग रमेशराव तरार, सुमित प्रकाश देशमुख, अजिंक्य राहुल पाटील, विजय गुलाबराव शिंरगवाडे, प्रभाग क्र.8 ब प्रांजली चेतन कुर्हाडे, अर्चना प्रशांत खेरडे, कमलेश्वरी सुशांत पांडव, दिप्ती एकनाथ शेरेकर
प्रभाग क्र.9 अ रोहीत ज्ञानेश्वर अंबाडकर, युवराज प्रल्हादराव आंडे, नरेंद्र गुलाबराव फसाटे, किरण नानाराव सावरकर, प्रभाग क्र.9 ब सिमा हरिष कानुगो, प्राजक्ता हर्षल चौधरी, नम्रता राहूल नेरकर
प्रभाग क्र.10 अ गौरव राजेंद्र खेरडे, धिरज मोहन खोडस्कर, संदीप ज्ञानेश्वर टाकरखेडे, तुषार रामहरी धुमटकर, जिवन रमेशराव मालपे, प्रभाग क्र.10 ब प्राची सागर काळे, वैष्णवी पवन काळे, अश्विनी शुभम चौधरी, ज्योती नरेंद्र बेलसरे, भारती मोहनराव भुस्कट, भारती प्रकाश माळोदे
प्रभाग क्र.11 अ भाग्यश्री निलेश अधव, कांता शंकर गवई, रुपाली चंद्रशेखर गवई, दिव्याणी स्वप्नील डंबाळे, बेबी जगदीश वानखडे, प्रभाग क्र.11 ब सईद खान हबीबुर हेमान खान, गोपाल भानुदास मनवर, महेंद्र भाऊराव देशमुख, मो.अश्पाक अ.गफ़फार, मो.निसार मो.शौकत, सै.नसरीन अंजुम इफ़तेखार हुसैन
प्रभाग क्र.12 अ आलिया तबस्स्ाुम शेख नाजीम कुरेशी, स्वाती मुकेश धोटे, प्रभाग क्र.12 ब अन्सार बेग करीम बेग, सागर रामकिशोर जैस्वाल, रईस खान बाबा खान, सैयद मिर गौस अली शब्बीर अली
प्रभाग क्र.13 अ सुवर्णा सुनिल तुमराम, नितेश ज्ञानेश्वर धुर्वे, रविंद्र नारायण मोरे, प्रभाग क्र.13 ब निलिमा गणेश काळे, प्राजक्ता योगेश चौधरी, कल्याण दिनेश नागले, मनिषा देवचंद बेलसरे यांचा समावेश आहे. वरुड नगरपरिषद निवडणुकीत निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन उपविभागीय अधिकारी प्रदीपकुमार पवार तर सहायक निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन वरुडचे मुख्याधिकारी गजानन भोयर काम पाहात आहेत.




