काँग्रेसचे राज्य सचिव आकाश तायडे दाम्पत्यासह भाजपात

विकासाच्या ध्येयावर विश्वास ठेवून अमरावतीत भव्य प्रवेश

अमरावती /17 नोव्हेंबर : काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आणि माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील व माजी आमदार रावसाहेब शेखावत यांचे समर्थक आकाश तायडे यांनी पत्नी सौ. कल्याणी आकाश तायडे यांच्यासह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विकासाभिमुख कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून तायडे दाम्पत्याने भाजपा अमरावती शहर जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश केला. या प्रवेश सोहळ्यात प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, भाजपा नेते किरण पातुरकर, महामंत्री बादल कुलकर्णी, ललित समदूरकर, सौ. राधाताई कुरील, मनपा पक्षनेता सुनील काळे, युवा मोर्चा अध्यक्ष विक्की शर्मा, सुनील साहू यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहिले.
प्रवेशानंतर आकाश तायडे यांनी शेगाव-रहाटगाव प्रभागासह संपूर्ण शहरात संघटना बळकट करण्याचा आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत विकास पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केला. प्रवेशकर्त्यांमध्ये त्यांच्या सहकार्‍यांचा समावेश होता. यावेळी सौ. सोनाली चेतन वर्धेकर, सौ. दिक्षा अमित मोहोड, सौ. लताताई काकडे, सौ. रचना मकेश्वर, सौ. मयुरी भरती, सौ. रुपाली काकडे, सौ. सोनाली दखने, सौ. राधिका मानेकर, सौ. किरण सरटकर, सौ. अपर्णा इंगळे, सौ. अश्विनी काकडे, सोनम जवरकर, स्नेहल मस्के, शामली गोतरकर, जतीन मकेश्वर, शुभम बोरकर, सचिन पावसे, अमित बोरखडे, सिद्धांत वाकडे, अभी सांगळूडकर, यश अरमाळे, अनिरुद्ध सटके, वैभव वाडोकार, भावेश क्षीरसागर, दुर्गेश चौधरी, सचिन राठोड, अभी जावरे, निखिल यावले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button