रेश्मा उमाळे यांना भाजपची उमेदवारी जाहीर
अखेर नगराध्यक्ष पदाकरिता

न.प.च्या मैदानात रेशमा उमाळे भाजपा, सोनल रोडे नगर विकास आघाडी, प्रतीक्षा गुल्हाने शिंदेगट, स्मिता अजमिरे अपक्ष, दिपाली भडांगे राष्ट्रीय काँग्रेस रिंगणात
मोशी /16 नोव्हेंबर : शहरातील दिग्गज राजकारणी तथा नागरिकांचे भारतीय जनता पार्टीची तिकीट कुणाला जाते याकडे लक्ष लागले होते अखेर बीजेपी ने सौ. रेशमा नितीन उमाळे यांच्या नावाला शिक्कामोर्तब केला. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगराध्यक्ष कोण याबाबत मोर्शी शहरात जोरदार चर्चा सुरू होती. नगराध्यक्ष पदाकरिता माजी नगराध्यक्षा रेशमा नितीन उमाळे व सौ. स्मिता प्रदीप अजमिरे यांची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु होती. उमेदवारांच्या नावाकरिता भाजपाच्या वरिष्ठ नेत्यात अनेकदा चर्चा सुरू होत्या. रेश्मा उमाळे व नितीन उमाळे हे सतत राज्यसभेचे खासदार डॉ. अनिल बोंडे तसेच मोर्शी वरुड विधानसभेचे आमदार चंदू उर्फ उमेश यावलकर यांच्या संपर्कात होते. तसेच मोर्शी शहरात सामाजिक व धार्मिक कार्यक्रमात सतत नितीन उमाळे यांचा सहभाग राहत असे त्यामुळे नगराध्यक्ष पदाची उमेदवारीची माळ सौ. रेश्मा उमाळे यांच्या गळ्यात भाजपाकडून पडली व रविवार दिनांक 16 नोव्हेंबर रोजी अखेर भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगराध्यक्ष पदाकरिता रेशमा नितीन उमाळे यांचे नाव जाहीर केल्याने उमाळे दांपत्यांनी राज्यसभेचे खासदार डॉ. अनिल बोंडे, महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख व मोर्शी विधानसभेचे आमदार यावलकर यांचे आभार मानले. सौ उमाळे यांना नगराध्यक्ष पदाची टिकीट जाहीर झाल्याने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.मोर्शी नगरपालिकेचे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून नगराध्यक्ष पदासाठी सौ. रेशमा नितीन उमाळे भाजपा, सौ. सोनल निलेश रोडे नगर विकास आघाडी, सौ. दिपाली विपुल भडांगे राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, सौ. प्रतीक्षा रवींद्र गुल्हाने शिवसेना ( शिंदे ) सौ. स्मिता प्रदीप अजमिरे अशा पाच नावाची चर्चा होत आहे मोर्शी नगरपरिषद क्षेत्रातील भाजपा हा सर्वात मोठा पक्ष मानल्या जात असून तसेच या पक्षाचे आमदार तसेच राज्यसभा खासदार असल्याने या पक्षाची ताकद वाढली असल्याचे चित्र दिसत असले तरी भाजपा ला प्रतिस्पर्धी म्हणून येथील नगर विकास आघाडी, शिंदे शिवसेना, तेवढ्याच ताकतीने उभी आहे त्यामुळे या ठिकाणी तिहेरी लढत होण्याची शक्यता असून नगराध्यक्ष पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडेल याकडे सर्व मोर्शीकर नागरिकांचे लक्ष वेधले आहे.




