रविवारीही नामांकनासाठी उमेदवारांची गर्दी
पालिका व नगरपंचायतींमध्ये नामांकनांचा वाढता ओघ

* तब्बल 652 अर्ज दाखल
अमरावती /16 नोव्हेंबर – येत्या 2 डिसेंबरला होणार्या पालिका आणि नगर पंचायत निवडणुकांसाठी रविवारीही दिवसभर नामांकन प्रक्रिया सुरूच होती. कार्यालये बंद होईपर्यंत अध्यक्ष पदाकरिता 27 तर सदस्य पदासाठी 625 असे एकूण 652 नामांकन अर्ज दाखल झाले. अध्यक्ष पदासाठी 10 उमेदवार रिंगणात आहेत. आज म्हणजेच 17 नोव्हेंबर हा नामांकनाचा शेवटचा दिवस असून, अंतिम दिवशी मोठी गर्दी उसळण्याची शक्यता आहे.
शेंदुर्जना घाट पालिकेत 8, चिखलदरा 14, धामनगाव रेल्वे 18, वरूड 51, चांदूर बाजार 40, चांदूर रेल्वे 40, दर्यापूर 41, धारणी 32, अंजनगाव सुर्जी 155, मोर्शी 87, अचलपूर 124, नांदगाव खंडेश्वर 15 असे अर्ज दाखल झाले. अध्यक्ष पदाच्या संदर्भात बोलायचे झाले तर चांदूर बाजार 4, धारणी 3, अंजनगाव 2, मोर्शी 7, अचलपूर 7, तर चांदूर रेल्वे, धामनगाव रेल्वे, वरुड आणि नांदगाव खंडेश्वर या ठिकाणी प्रत्येकी एका उमेदवाराने अर्ज सादर केला.
नगराध्यक्ष व सदस्य पदाचे नामांकन आकडेवारी
नगरपरिषद/ नगरपंचायत नगराध्यक्ष सदस्य
चांदूर बाजार – 4 40
चांदूर रेल्वे – 1 40
अंजनगाव – 2 155
मोर्शी – 7 87
धारणी – 3 32
धामणगाव – 1 18
अचलपूर – 7 124
वरूड – 1 51
चिखलदरा – — 14
दर्यापूर – — 41
नांदगाव खंडेश्वर – 1 15
शे. घाट – — 8




