शहरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

पादचारी व दुचाकीस्वार प्रभावित

परतवाडा /16 नोव्हेंबर – परतवाडा शहरातील जयस्तंभ चौक परिसरात गेल्या दोन दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. दहा ते पंधरा कुत्र्यांचे गट एकाचवेळी रस्त्यावर धावत असल्यामुळे पादचारी आणि दुचाकी चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. काही कुत्री दुचाकीस्वारांच्या मागे धावण्याचा प्रयत्न करत असल्याने दुर्घटनांची शक्यता वाढली आहे. पालिका प्रशासन निवडणूक संबंधित कामकाजात गुंतल्याने या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याची नाराजी नागरिकांत व्यक्त होत आहे. भटक्या कुत्र्यांवर तत्काळ कारवाई करून परिसर सुरक्षित करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button