दुचाकीच्या धडकेत एक ठार तर एक गंभीर
तिवसा बसस्थानका समोरील घटना

तिवसा /16 नोव्हेंबर : अमरावतीवरून नागपूरच्या दिशेने जाणार्या एका भरधाव दुचाकीने महामार्गा ओलांडून जातं असलेल्या 53 वर्षीय व्यक्तीला जबर धडक दिली यात त्यांचा मृत्यू झाला तर एक मुलगी गंभीर जखमी आहे. ही घटना आज ता. 16रोजी दुपारी 3वाजता दरम्यान तिवसा बस स्थानका समोर घडली. संजय नामदेव पाटील रा. शेंदुरजना खुर्द, तिवसा असे मृतकांचे नाव असून लक्ष्मी चौरागडे वय 17, रा. नागपूर असे या अपघातात गंभीर जखमी असलेल्या मुलीचे नाव आहे.दुचाकीस्वर राजेंद्र मोरे वय 18, रा.अमरावती हा देखील किरकोळ जखमी आहे. लक्ष्मी व राजेंद्र हे दोघेही दुचाकीने अमरावतीवरून नागपूरला जातं होते, दरम्यान तिवसा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या तिवसा बसस्थानका समोर संजय पाटील हे महामार्गा ओलांडून जातं असताना राजेंद्र याच्या दुचाकीची जबर धडक बसल्याने पाटील यांचा मृत्यू झाला तर लक्ष्मी चौरागडे ही गंभीरित्या जखमी झाली. यावेळी घटनास्थळी उपस्थित नागरिकांच्या मदतीने त्यांना तिवसा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र लक्ष्मी चौरगडे हिची प्रकृती गंभीर असल्याने तिला तातडीने अमरावती जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. दुचाकीने घेतला पेट-हा अपघात इतका विचित्र होता की मृतक संजय पाटील यांना दुचाकीने काही अंतरापर्यंत फरफाटत नेले ज्यामुळे दुचाकीने क्षणातच मोठा पेट घेतला होता.त्यानंतर तिवसा नगरपंचायतच्या अग्निशमन बंबने आगीवर नियंत्रण मिळवले. यावेळी नागरिकांची एकच गर्दी झाली होती.




