अज्ञात इसमाची गळफास घेवून आत्महत्या

मोर्शी / 3 जून: मोर्शी लगतच येरला गावाजवळ नाल्याच्या काठावरील एका झाडावर 55 वर्षीय इसमाचे प्रेत गळफास घेउन लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली. ही घटना आज मंगळवार, 3 जून रोजी दुपारी 3:30 वाजता उघडकीस आली.
पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मोर्शी पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्‍या येरला येथील नाल्याच्या काठावर एका 50 ते 55 वर्षीय अनोळखी इसमाचे प्रेत झाडावर गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यानंतर गावातील काही लोकांनी याची माहिती मोर्शी पोलीस स्टेशनला दिली. घटनास्थळ गाठून पोलिसांनी युवकाचा मृतदेह झाडावरून खाली काढला. त्याचे अंगात हिरवट रंगाची फुल बाहीची बनियान व निळसर रंगाचा ट्रॅक पॅन्ट होता. या अनोळखी इसमाबद्दल माहिती प्राप्त झाल्यास मोर्शीचे ठाणेदार नितीन देशमुख ह्यांचे मो.क्र. 9923042565 वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button