अनैतिक संबंधातून प्रियकराच्या मदतीने पतीची हत्त्या

क्राईम ब्रांचने 8 तासांत केला गुन्ह्याचा उलगडा

अमरावती /13 नोव्हेंबर – बडनेरा परिस रातील भानखेडा मार्गावरील हनुमान गढीच्या मागे असलेल्या जंग लात बुधवारी रात्री एका युवकाचा मृतदेह सापडला. त्याचा चेहरा दगडाने ठेचलेला होता. पोलिसांनी तपास सुरू केला असता ही हत्या अनैतिक संबंधांच्या कारणावरून झाल्याचे समोर आले.
क्राईम ब्रांचचे निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या पथकाने फक्त आठ तासांत आरोपीला अटक केली. मृतकाचे नाव प्रमोद बकाराम भलावी (42, रा. कारळा, ता. चांदूर रेल्वे, मूळ रा. चंद्रपूर) असे आहे. त्याची पत्नी छाया भलावी आणि तिचा प्रियकर विश्वां बर दिगंबर मांजरे (39, रा. विश्वी, ता. मेहकर, जि. बुलढाणा) यांनी मिळून हा खून केला. बुधवारी सायंकाळी काही चरवाह्यांना जंगलात मृतदेह दिसल्याने त्यांनी पोलिसांना कळवले. घटनास्थळी थानेदार सुनील चव्हाण, सहाय्यक आयुक्त कैलास पुंडकर, निरीक्षक संदीप चव्हाण आणि क्राईम ब्रांचचे पथक पोहोचले. मृतदेहाशेजारी सापडलेल्या दुचाकीवरून तपासाची दिशा मिळाली आणि मृताची ओळख पटली. छाया भलावी ही चौकशीत अडखळत्या स्वरात बोलत असल्याने पोलिसांना संशय आला. तपासात ती आणि विश्वांबर मांजरे हे परस्परांशी अनैतिक संबंधात असल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी विश्वी गावात जाऊन आरोपीला ताब्यात घेतले. त्याने चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली. आणि क्राईम ब्रांचने आरोपीला बुलढाण्यातून ताब्यात घेऊन अमरावतीत आणले. आरोपीने घटनास्थळी नेऊन कोयता कुठे लपवला होता हे दाखवले. पोलिसांनी कोयता आणि वापरलेली दुचाकी (एमएच 28 एनबी 1399) जप्त केली. आरोपी विश्वांबर मांजरे आणि मृतकाची पत्नी छाया भलावी यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बडनेरा पोलीस करत आहेत. या कारवाईत पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, उपायुक्त गणेश शिंदे, रमेश धुमाळ, श्याम घुगे, सहाय्यक आयुक्त शिवाजीराव बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संदीप चव्हाण, सहायक निरीक्षक इमरान नायकवडे, अनिकेत नासार, दीपक सुंदरकर, संभाजी केन्द्रे, मनोज ठोसर, संग्राम भोजने, अतुल संभे, राजीक रायलीवाले, राहुल ढेंगेकार, नरेश मोहरील व सुषमा आठवले यांनी सहभाग घेतला.
कसा केला खून-डिसेंबर 2024 मध्ये विश्वांबर हा मिस्त्रीच्या कामानिमित्त छायाच्या घरी गेला होता. त्यानंतर दोघांमध्ये संबंध निर्माण झाले. दीपावलीच्या सुट्टीत प्रमोद भलावी चंद्रपूरहून अंजनगाव बारी येथे पत्नीला भेटायला आला असता, त्याला या संबंधांची माहिती मिळाली. त्यामुळे छाया आणि विश्वांबर यांनी 10 नोव्हेंबरच्या रात्री त्याचा खून करण्याचा कट रचला. त्या रात्री प्रमोदला दुचाकीवर बसवून भानखेडा रोडवरील हनुमानगढीच्या मागे असलेल्या जंगलात नेले. तिथे कोयत्याने वार करून त्याचा खून केला आणि पुरावे नष्ट करण्यासाठी चेहरा दगडाने ठेचला. आरोपी तिथून पसार झाले.

संबंधित बातम्या

Back to top button