आनंद गायकवाड यांची आत्महत्या
कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सदस्य

कुष्टा गावात पसरली शोककळा
परतवाडा /13 नोव्हेंबर – अचलपूर तालुक्यातील कुष्टा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सदस्य आनंद विश्वनाथ गायकवाड (वय 50) यांनी गुरुवारी (दि. 13 नोव्हेंबर) संध्याकाळी विष प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, गावात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या मा हिती नुसार, आनंद गायकवाड हे काही काळा पासून मानसिक तणावाखाली होते. गुरुवारी संध्याकाळी त्यांनी राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले. काही वेळातच त्यांची प्रकृती बिघडल्याने कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गायकवाड यांनी सरपंच म्हणून कार्यरत असताना गावातील विविध विकासकामांवर विशेष लक्ष केंद्रित केले होते. त्यांच्या थेट बोलण्याच्या स्वभावामुळे आणि स्वच्छ प्रतिमेमुळे ते सर्वसामान्य जनतेत लोकप्रिय होते. त्यांच्या निधनाने ग्रामस्थ, राजकीय सहकारी आणि मित्रपरिवारात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार असून, त्यांच्या निधनाने कुष्टा गाव शोकमग्न झाले आहे.




