अमरावतीत साकारणार जीणमाता-शाकंभरी मातेचे भव्य मंदिर
16 नोव्हेंबर रोजी भूमिपूजन समारंभ

* माऊली सरकार व आ.रवि राणा यांची राहणार प्रमुख उपस्थिती
अमरावती /13 नोव्हेंबर : बडनेरा रोडवरील रणथंबोरजवळील गजानन नगर येथे माता जीणमाता आणि शाकंभरी मातांचे संयुक्त भव्य मंदिर उभारण्यात येणार आहे. या मंदिरासाठी स्व.जुगलकिशोरजी व्दारकाप्रसाद अग्रवाल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दैनिक अमरावती मंडल परिवार आणि राजेश जूगलकिशोर अग्रवाल यांनी दान केलेल्या भूमीवर 16 नोव्हेंबर रोजीसकाळी 10 वाजता भूमिपूजन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
या भव्य मंदिराच्या उभारणीचा संकल्प मां कुलदेवी ट्रस्टने केला असून, या भूमिपूजन समारंभाचे अध्यक्षस्थान अनिल जुगलकिशोर अग्रवाल भूषवणार आहेत. या कार्यक्रमास कौडण्यपूर येथील रुख्मीनी विदर्भपीठाचे पिठाधिश्वर अनंत श्री विभुषीत श्री रामानंदाचार्य स्वामी रामराजेश्वर चार्य महाराज (माऊली सरकार) तसेच आमदार रवि राणा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. त्यांच्या हस्ते मंदिराच्या बांधकामासाठी भूमिपूजन विधी पार पडेल. या कार्यक्रमाचे वैदिक मंत्रोच्चार पंडित करण गोपाल शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडले जाणार आहेत. मंदिर उभारणीसाठी आर्थिक मदत करणार्या अग्रवाल समाजातील दात्यांचा आणि मां कुलदेवी ट्रस्टच्या पदाधि कार्यांचा सत्कार या प्रसंगी केला जाणार आहे. मंदिरासाठी दान केलेली भूमी दैनिक अमरावती मंडल परिवार आणि राजेश अग्रवाल यांनी उपलब्ध करून दिली आहे. समाजातील अनेक श्रद्धाळूंनी एक लाख, पाच लाख, नऊ लाख आणि अकरा लाख रुपयांपर्यंतची देणगी दिली असून, त्यांच्या योगदानामुळे हा भव्य प्रकल्प साकार होणार आहे. या मंदिराच्या उभारणीसाठी मां कुलदेवी ट्रस्टचे अध्यक्ष अनिल जुगलकिशोरजी अग्रवाल, उपाध्यक्ष राधेश्याम हनुमानदासजी अग्रवाल, माणिकचंद बंसीलालजी जालान, प्रभाशंचंद्र दुर्गादत्तजी अग्रवाल, सचिव सत्यनारायण बालकिशनजी अग्रवाल, सहसचिव मनीष विजयजी अग्रवाल, कोषाध्यक्ष राजकुमार छगनलालजी अग्रवाल, सहकोषाध्यक्ष संजय अनिलजी अग्रवाल, संचालक सदस्य डॉ. पवन सुभाशचंद्रजी अग्रवाल, सुरेश मोतीलालजी अग्रवाल, विनोद फकीरचंद्रजी अग्रवाल, सुनील वेधप्रकाशजी अग्रवाल, विजय संत्यनारायनजी खंडेलवाल, राकेश रविंद्रकुमारजी अग्रवाल, ओमप्रकाश मदनलालजी अग्रवाल, डॉ. पवन शिवप्रकाशजी ककरानीया, शाम पुरुषोत्तमजी अग्रवाल, नितीन रामगाविंदजी अग्रवाल, रमेशकुमार जगदिश प्रसादजी अग्रवाल, सुनील नवरंगरायजी अग्रवाल, व सीए. राजेंद्र रामगोपालजी अग्रवाल, यांच्या सह धिरेंद्र बिहारीलालजी अग्रवाल, अजय बिहारीलालजी अग्रवाल, डॉ. अनिल प्रभूदयालजी धामोरीकर, गणेश बालकीशनजी अग्रवाल, विजय बालकिशनजी अग्रवाल, संजय धनराजजी खंडेलवाल, संदीप पुरुषोत्तमजी अग्रवाल गोविंदराम ब्रिजमोहनजी अग्रवाल, नारायण जगदिश प्रसादजी अग्रवाल, अशोक जगदीश प्रसादजी अग्रवाल यांच्यासह अनेक मान्यवरांचे मोलाचे योगदान आहे. या प्रसंगी मां कुलदेवी ट्रस्टच्या वतीने सर्व श्रद्धाळूंना आवाहन करण्यात आले आहे की, 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता होणार्या या भूमिपूजन समारंभाला सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. तसेच ज्यांना मंदिर उभारणीसाठी आपले सहकार्य द्यायचे असेल, त्यांनी ट्रस्टचे सचिव सत्यनारायण अग्रवाल (मो. 9422875851) यांच्याशी संपर्क साधावा.
या मंदिराची भव्य रचना अकोला येथील नामांकित वास्तुविशारद पंकज विराणीया यांनी अत्यंत सुबक आणि शास्त्रीय पद्धतीने साकारली आहे. त्यांच्या आराखड्यानुसार सुमारे सात हजार चौरस फूट क्षेत्रफळावर हे दोन मजली दिव्य मंदिर उभारण्यात येणार आहे. मंदिराच्या परिसरात जीणमाता व शाकंभरी मातांचे मुख्य मंदिर, तसेच शिवचतुर्भुज, भैरवजी आणि हनुमानजी यांच्या स्वतंत्र मंदिरांचाही समावेश असेल. भक्तांना सर्व सोयी उपलब्ध व्हाव्यात यासाठी विवाह मंडप, भोजनशाळा, स्वयंपाकघर, अतिथीगृह आणि पुजार्यांच्या निवासस्थानाची सुसज्ज व्यवस्था करण्यात आली आहे. दोन मजली या आधुनिक इमारतीत लिफ्टची सोय, आकर्षक सजावट, आणि पारंपरिक शैलीत आधुनिकतेचा संगम साधणारी साजसज्जा असेल. संपूर्ण प्रकल्पाचे बांधकाम एका वर्षाच्या आत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवून काम सुरू करण्यात आले आहे. भव्यता, भक्ती आणि वास्तुशिल्प यांचा संगम असलेले हे मंदिर परिसराचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक केंद्रस्थान ठरणार आहे.




